आदर्शच्या ४७७ विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरण पूरक गणेश मूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:21 AM2021-09-13T04:21:21+5:302021-09-13T04:21:21+5:30

कुर्डूवाडी : १० सप्टेंबरपासून संपूर्ण भारतभर गणेशोत्सवास प्रारंभ झाला. या उत्सवाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व कल्पनाशक्तीला वाव मिळावा, ...

Ganesh idols made by 477 students of Adarsh | आदर्शच्या ४७७ विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरण पूरक गणेश मूर्ती

आदर्शच्या ४७७ विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरण पूरक गणेश मूर्ती

Next

कुर्डूवाडी : १० सप्टेंबरपासून संपूर्ण भारतभर गणेशोत्सवास प्रारंभ झाला. या उत्सवाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व कल्पनाशक्तीला वाव मिळावा, पर्यावरणाचेही रक्षण व्हावे या हेतूने येथील आदर्श पब्लिक स्कूल अँड जुनिअर कॉलेज यांच्याकडून विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन पद्धतीने व झूम ॲपद्वारे गणपती निर्माण करण्याची कार्यशाळा पार पडली.

या कार्यशाळेमध्ये शाळेचे कला शिक्षक राहुल चंदनकर यांनी विद्यार्थ्यांना पिंपळाच्या पानापासून गणपतीची मूर्ती तयार करणे, मातीपासून गणपतीची मूर्ती तयार करणे यासंदर्भात मार्गदर्शन केले. पल्लवी नवगिरे यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमामध्ये सुमारे ४७७ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमोल सुरवसे, कार्यकारी संचालिका पूजा सुरवसे यांचे मार्गदर्शन लाभले.

..............

फोटो- १२ आदर्श स्कूल

आदर्शच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक गणेश मूर्ती साकारल्या.

120921\img-20210912-wa0361.jpg~120921\img-20210912-wa0364.jpg

कुर्डूवाडीतील आदर्श पब्लिक स्कूलचा विद्यार्थी पर्यावरण पूरक गणेश मूर्ती बनविताना दिसत आहे.~कुर्डूवाडीतील आदर्श पब्लिक स्कूलचे विद्यार्थी पर्यावरण पूरक गणेश मूर्ती बनवून दाखविताना दिसत आहे.

Web Title: Ganesh idols made by 477 students of Adarsh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.