गणेशभक्तांना विघ्नहर्त्याच्या स्वागताचे वेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:23 AM2021-07-27T04:23:24+5:302021-07-27T04:23:24+5:30

सध्या पंढरपूर रोडवरील यात्रा पटांगण राजस्थानी मूर्तिकार ‘बाप्पां’च्या मूर्ती बनविण्यात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे, तर शहरासह तालुक्यातील कुंभारवाड्यात ...

Ganesha devotees are welcomed by Vighnaharta | गणेशभक्तांना विघ्नहर्त्याच्या स्वागताचे वेध

गणेशभक्तांना विघ्नहर्त्याच्या स्वागताचे वेध

googlenewsNext

सध्या पंढरपूर रोडवरील यात्रा पटांगण राजस्थानी मूर्तिकार ‘बाप्पां’च्या मूर्ती बनविण्यात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे, तर शहरासह तालुक्यातील कुंभारवाड्यात गणेशमूर्ती बनविण्याच्या कामाला वेग आला आहे. १० सप्टेंबर रोजी गणपतीचे आगमन होत असून, १९ सप्टेंबर रोजी विसर्जन होणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट असल्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाच्या सुधारित नियमावलीची चिंता लागून राहिली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून राजस्थान येथील गणेश मूर्तिकार गंगाराम कुंभार, भंवरलाल कुंभार, डुंगाराम कुंभार, रमेश कुमार बावरी, सरवण कुंभार, लालाराम कुंभार, चंपालाल कुंभार परिवारातील सदस्य वर्षभर विघ्नहर्त्या गणपतीच्या विविध आकार व रूपातील सुबक अशा १ फुटापासून अधिकाधिक उंचीच्या गणेशमूर्ती बनवीत होते. गतवर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये लाॅकडाऊनमुळे सर्वांचे कुटुंब आपल्या मूळ गावी राजस्थानला परतले होते. ते आता सांगोल्यात परतले आहे.

गणेशमूर्तीच्या उंचीवर शासनाचे निर्बंध

गणेशभक्तांसह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना हवी असेल तशी ‘श्रीं’ची मूर्ती माफक दरात मिळत असल्याने मंडळाचे सदस्यही निश्चिंत असतात. त्याचबरोबर शासनाने यंदाही घरगुती गणपतीची उंची २ फूट, तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मूर्तीची उंची ४ फुटांपर्यंत ठेवावी, असे आवाहन केल्यामुळे उंच ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना करणाऱ्या मंडळावर निर्बंध असणार आहेत.

मिरवणुकीविना करावे लागणारे विसर्जन

सलग दहा दिवस गणेशोत्सव आल्याने सार्वजनिक गणेश मंडळांना यंदाही कोरोनाच्या सावटाखाली साधेपणाने साजरा करून मिरवणुकीविना गणेश विसर्जन करावे लागणार आहे. अशातच शासनाने ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई केल्यामुळे गणेश भक्तांच्या आनंदावर विरजण पडणार आहे.

फोटो ओळ ::::::::::::::::

राजस्थानी गणेश मूर्तिकारांकडून पंढरपूर रोडवरील यात्रा पटांगणात गणेशमूर्ती बनविण्याचे काम सुरू असल्याचे छायाचित्र.

Web Title: Ganesha devotees are welcomed by Vighnaharta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.