गणेशोत्सव मंडळांनी केली साधेपणाने ‘श्री’ची प्रतिष्ठापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:23 AM2021-09-11T04:23:48+5:302021-09-11T04:23:48+5:30
गणेश चतुर्थीनिमित्त १० दिवसांच्या वास्तव्यासाठी येणाऱ्या गणरायांच्या स्वागतासाठी अकलूज परिसरातील आबालवृद्ध गणेशभक्त आतुरलेले होते. सकाळीपासूनच ‘श्री’च्या प्रतिष्ठापनेसाठी लगबग सुरु ...
गणेश चतुर्थीनिमित्त १० दिवसांच्या वास्तव्यासाठी येणाऱ्या गणरायांच्या स्वागतासाठी अकलूज परिसरातील आबालवृद्ध गणेशभक्त आतुरलेले होते. सकाळीपासूनच ‘श्री’च्या प्रतिष्ठापनेसाठी लगबग सुरु होती. विजय चौक येथून गणेश भक्तांनी ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’चा जयजयकार करीत ‘श्री’चे आगमन झाले. घरोघरी महिलांनी श्रीगणेशाचे उत्साहात स्वागत करून पूजा, आरती केली. सायंकाळी अकलूज परिसरातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी शासकीय नियमांचे पालन करत ‘श्री’ची मूर्ती असते तेथेच प्रतिष्ठापना करून गणेशोत्सवाला प्रारंभ केला.
या मंडळांनी केली प्रतिष्ठापना
अकलूज शहरातील श्री विजय गणेशोत्सव मंडळ, लोकमान्य गणेशोत्सव मंडळ, महात्मा फुले गणेशोत्सव मंडळ, शिवरत्न गणेशोत्सव मंडळ, छत्रपती गणेशोत्सव मंडळ, सन्मित्र गणेशोत्सव मंडळ, जय मल्हार गणेशोत्सव मंडळ, बुरजा गणेशोत्सव मंडळ, सदुभाऊ गणेशोत्सव मंडळ, शिवापुरपेठ गणेशोत्सव मंडळ, नवभारत गणेशोत्सव मंडळ, सिद्धीविनायक गणेशोत्सव मंडळासह सर्वच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ‘श्री’ची प्रतिष्ठापना केली.