या टोळीने भीमा कारखाना गिळला; ‘विठ्ठल’चे वाटोळे केले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:22 AM2021-04-08T04:22:44+5:302021-04-08T04:22:44+5:30
पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखाना कै. औदुंबरअण्णा पाटलांनी मोठ्या कष्टाने उभारला. शेतकऱ्यांच्या कष्टाच्या पै-पै चा हिशोब त्यांनी कायम ...
पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखाना कै. औदुंबरअण्णा पाटलांनी मोठ्या कष्टाने उभारला. शेतकऱ्यांच्या कष्टाच्या पै-पै चा हिशोब त्यांनी कायम दिला. त्यामुळे विठ्ठल साखर कारखाना राज्यात अग्रक्रमावर कायम असायचा. भीमा सहकारी साखर कारखानाही अडचणीत असताना कै. सुधाकरपंतांनी कर्जाच्या खाईतून बाहेर काढत नफ्यात आणला होता. या दोन्ही कारखान्यांमुळे शेतकऱ्यांना मोठा आधार असला तरी शेतकऱ्यांची फसवणूक करून, खोटी आश्वासने देऊन कारखान्याच्या निवडणुका जिंकल्या. व त्याच शेतकऱ्यांच्या हक्काच्या या सहकारी संस्था आर्थिक अडचणीत आणून दिवाळखोरीत काढण्याचे उद्योग या टोळीने केले आहेत, असा आरोपही आ. परिचारक हे ठिकठिकाणच्या प्रचारसभांमध्ये करीत आहेत.
यावेळी उमेदवार समाधान आवताडे, भाजपचे संघटनमंत्री बाळा भेगडे, श्रीकांत देशमुख यांच्यासह विविध सेलचे पदाधिकारी उपस्थित होते.