गाणगापूरच्या बसला अपघात, ST पलटी झाल्याने 36 प्रवासी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2022 12:42 PM2022-07-24T12:42:36+5:302022-07-24T13:10:28+5:30

बस दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळ धाव घेत मदतकार्य सुरू केले

Gangapur bus accident, 15 passengers injured as ST overturns in solapur | गाणगापूरच्या बसला अपघात, ST पलटी झाल्याने 36 प्रवासी जखमी

गाणगापूरच्या बसला अपघात, ST पलटी झाल्याने 36 प्रवासी जखमी

googlenewsNext

सोलापूर - प्रसिद्ध धार्मिकस्थळ असलेल्या गाणगापूर डेपोच्या एसटी बसचा अक्कलकोट-मैंदर्गी रस्त्यावर अपघात झाल्याची घटना घडली. अक्कलकोट - मैंदर्गी रस्त्यावरील देशमुख शेतालगत ही बस सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास पलटी झाली. बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांपैकी जवळपास 35 ते 36 प्रवासी जखमी असून सर्वांना अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. 

बस दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळ धाव घेत मदतकार्य सुरू केले. तर, पोलीस प्रशासनानेही घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रुग्णालयात पाठविण्यासाठी स्थानिकांनी मोठी मदत केली. मात्र, रुग्णालयात एकच डॉक्टर असल्याने खासगी डॉक्टरांना देखील पाचरण करण्यात आले. आहे. दरम्यान, अपघाताचे नेमके कारण अद्यापही समजून शकले नाही. बस पलटी झाल्याने बसचेही मोठे नुकसान झाले आहे.

Web Title: Gangapur bus accident, 15 passengers injured as ST overturns in solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.