सहा वर्षाच्या संकटातून फुलवलेली बाग अर्ध्या तासात खल्लास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:19 AM2021-04-05T04:19:59+5:302021-04-05T04:19:59+5:30

या घटनेची माहिती समजताच आमदार राम सातपुते यांनी शेताच्या बांधावर धाव घेत शेतकऱ्याला नुकसान भरपाईसाठी मी कटिबद्ध असल्याचा विश्वास ...

The garden blossomed in half an hour after six years of crisis | सहा वर्षाच्या संकटातून फुलवलेली बाग अर्ध्या तासात खल्लास

सहा वर्षाच्या संकटातून फुलवलेली बाग अर्ध्या तासात खल्लास

Next

या घटनेची माहिती समजताच आमदार राम सातपुते यांनी शेताच्या बांधावर धाव घेत शेतकऱ्याला नुकसान भरपाईसाठी मी कटिबद्ध असल्याचा विश्वास व्यक्त केला.

गेल्या काही वर्षांपासून शेतकरी विविध संकटांचा सामना करत आहे. निंबाळकर कुटुंबातील शेतकऱ्यांनी गेल्या दुष्काळात टँकरच्या मदतीने डाळिंब बाग जोपासली होती. यासाठी बँकेचे कर्ज घेऊन डाळिंब बाग चांगली फुलविली. मात्र अचानक आगीच्या संकटामुळे लाखो रुपयांच्या नुकसानीचा सामना या कुटुंबाला करावा लागत आहे.

यामुळे या घटनेची शासनदरबारी नोंद घेऊन नुकसान भरपाई मिळावी, अशी आग्रही मागणी शेतकऱ्यांनी आमदार राम सातपुते यांच्याकडे केली आहे. यावेळी तालुका कृषी अधिकारी गजानन ननवरे, महावितरणचे उपअभियंता प्रवीण कुंभारे, तलाठी पी. जी. उदगावे, हनुमंत दुधाळ, शिवराज निंबाळकर, नंदकुमार लवटे आदी उपस्थित होते.

मल्चिंगने केला घात

सहा वर्षांपूर्वी डाळिंबाची लागवड केली होती. नुकताच दोन-तीन महिन्यापूर्वी बहार धरला होता. खत व औषधासाठी चार लाखाचे बँकेचे कर्ज घेतले होते. सध्या डाळिंबाचे बाजारभाव तेजीत असल्याने निंबाळकर कुटुंब डोळ्यात तेल घालून बागेची निगा राखत होते. उन्हाळ्यात पाण्याची कमतरता येऊ नये तसेच पाण्याचे बाष्पीभवन होऊ नये म्हणून झाडांच्या बुंध्याजवळ उसाचे पाचट टाकले होते. त्यातच घात झाला अन् शेजारी पेटलेल्या उसाच्या फडाचा वणवा डाळिंबाच्या बागेत शिरला.

फोटो ::::::::::

विजेच्या शॉर्टसर्किटमुळे जळीत झालेल्या डाळिंब बागेची पाहणी करताना आ राम सातपुते व इतर.

Web Title: The garden blossomed in half an hour after six years of crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.