गॅस अन्‌ शेगडी पंचायत समिती आवारात.. दिवसभर धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:23 AM2021-01-23T04:23:06+5:302021-01-23T04:23:06+5:30

यावेळी सभापती विक्रमसिंह शिंदे व गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील यांनी सायंकाळी सात वाजता संबंधित मागण्या मान्य करीत फेब्रुवारी ...

Gas and Shegdi Panchayat Samiti premises | गॅस अन्‌ शेगडी पंचायत समिती आवारात.. दिवसभर धरणे आंदोलन

गॅस अन्‌ शेगडी पंचायत समिती आवारात.. दिवसभर धरणे आंदोलन

Next

यावेळी सभापती विक्रमसिंह शिंदे व गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील यांनी सायंकाळी सात वाजता संबंधित मागण्या मान्य करीत फेब्रुवारी महिन्यापर्यंत त्या पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन दिल्यानंतर ते आंदोलन मागे घेण्यात आले.

पंचायत समितीच्या आवारात माढा तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने गॅस व शेगडी आणून समोर ठेवत विविध मागण्यांसाठी बेमुदत आंदोलन सुरू केले होते. त्यावेळी त्यांना प्रथम सभापती विक्रमसिंह शिंदे व उपसभापती धनाजी जवळगे यांनी भेट देत याबाबत कार्यवाही करण्यात येईल, त्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात येतील असे सांगितले. तरीही आंदोलन दिवसभर सुरू राहिले. यावेळी सायंकाळी गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना प्रत्यक्ष भेट देऊन चर्चा केली व लवकरच तोडगा काढला जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी आंदोलन माघे घेतले.

यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष कॉ. तानाजी ठोंबरे, जिल्हा सचिव ए. बी. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष राजेंद्र बनसोडे, सदस्य बाळासाहेब चांदणे, धनाजी आखाडे, मुबारक मुलाणी, लाला ओहोळ, सुरेश कुंभार, ताजुद्दीन मुलाणी, कालिदास शिंदे, सतीश गायकवाड, मुस्तफा सय्यद, रामदास जाधव, साहेबराव जाधव, भैरू शेलार, बंडू पाटोळे, केशव कुलकर्णी, अमोल देवकुळे यांच्याबरोबरच तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला होता.

फोटो: २२ कुर्डूवाडी-धरणे

माढा पंचायत समितीच्या आवारात तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत आंदोलन केले. त्यावेळी सभापती विक्रमसिह शिंदे, उपसभापती धनाजी जवळगे त्यांच्याशी चर्चा करताना.

Web Title: Gas and Shegdi Panchayat Samiti premises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.