सोलापुरात गॅस टाकीचा स्फोट; महिलेसह चार वर्षाचा मुलगा जखमी
By Appasaheb.patil | Published: January 5, 2020 07:05 AM2020-01-05T07:05:19+5:302020-01-05T07:10:39+5:30
डफरीन चौकात घडलेली घटना; मॅरेथॉन स्पर्धेसाठी धावणाऱ्या धावपटूची झाली होती गर्दी
सोलापूर : डफरीन चौक येथे गॅसचे फुगे भरतांना टाकीचा स्फोट होऊन एका महिलेसह १४ वर्षाचा मुलगा जखमी झाल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की रविवारी पहाटे सोलापुरातील एका संस्थेकडून मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं. मॅरेथॉन स्पर्धेसाठी या परिसरात सुमारे पाच हजारांहून अधिक धावपटू जमा झाले होते. अचानक गॅसचे फुगे भरताना टाकीचा स्फोट झाला आणि सर्वत्र एकच चर्चा सुरू झाली कशाचा आवाज आला.
या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस दलातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी दाखल झाले. हा स्फोट नेमका कशामुळे झाला त्याच्या मागील कारण काय हे अद्याप समजू शकलेले नसून पोलीस अधिक तपास करीत आहेत.