खानापूर बंधाºयाचे दरवाजे उचकटून रात्रीत पाणी पळवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2020 08:53 PM2020-05-01T20:53:16+5:302020-05-01T21:55:55+5:30

पोलिसात गुन्हा : ग्रामस्थांच्या १२ तासांच्या प्रयत्नानंतर पाणी थांबले...!

The gates of Khanapur dam were flooded at night | खानापूर बंधाºयाचे दरवाजे उचकटून रात्रीत पाणी पळवले

खानापूर बंधाºयाचे दरवाजे उचकटून रात्रीत पाणी पळवले

googlenewsNext

सोलापूर : कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यातील पाण्याचा वाद पुन्हा उन्हाळ्यात उफ ाळून येत  आहे.  शुक्रवारी रात्री गुबेवाड (ता. इंडी, जि़ विजापूर) येथील जवळपास ३० लोकांच्या जमावाने सीमावर्ती भागात अक्कलकोट तालुक्यात खानापूर येथील बंधाºयावर येऊन दरवाजे उचकटले आणि कर्नाटकमध्ये पाणी पळवले, त्यानंतर आलेल्या वाहनातून त्यांनी पळ काढला. दरम्यान, ही घटना समजताच खानापूर आणि अंकलगेतील ग्रामस्थ बंधाºयावर आले आणि १२ तासांच्या अथक प्रयत्नानंतर हे पाणी थांबवले.


 कोरोना आजाराने जगभरात थैमान घातले आहे. सोलापूर जिल्ह्यात सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली असून घराबाहेर पडणाºयांवर पोलीस कारवाया होत आहेत. नेमके याचाच फायदा उठवत शुक्रवारी रात्री दीड वाजेच्या दरम्यान इंडी तालुक्यातील जवळपास ३० जणांचा जमाव एका मालवाहतूक वाहनातून (के़ ए़ १५ /१८ १५६)  अक्कलकोटमधील खानापूर बंधाºयावर पोहचले़  या पाठोपाठ एका दुचाकीवरुन (एम़ एच़१३ / डी़ डी़ ३७५१) काहीजण आले. सारेजण मिळून बंधाºयावरील प्लेट उचकटून काढले. काही प्लेट पाण्यात टाकून दिले. यानंतर मोठ्या प्रमाणात पाणी वाहून कर्नाटकात गेले. त्यानंतर या लोकांनी आलेल्या वाहनातून पळ काढला. संचारबंदी काळात वाहनातून पळ काढणारे लोक अंकलगे आणि खानापूरमधील लोकांच्या निदर्शनास आले. 


 यानंतर या दोन्ही गावात ही बातमी रात्री वाºयासारखी पसरली. अंकलगेचे माजी सरपंच शिवमूर्ती विजापुरे आणि आंबण्णा विजापुरे हे दोन्ही गावच्या ग्रामस्थांना घेऊन बंधाºयावर दाखल झाले. त्यांनी रात्री बारदाने (पोती) आणि काही बॅरेगेट शोधून पाणी अडवले. काही ठिकाणी तशीच गळती चालू राहिली.
 -----------
खानापूर येथील भीमा नदी बंधाºयावरील दरवाजे काढून अज्ञात लोकांनी पाणी पळवले आहे. याबाबत अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ग्रामस्थांच्या मदतीने पाणी थांबवले आहे. सध्या या बंधाºयातून खानापूर, अंकलगे आणि गुड्डेवाडी या गावांना पाणी पुरवठा होतो. आणखी दोन महिने पुरेल इतका पाणी साठा बंधाºयात आहे़ पुन्हा पाणी पळविले जाणार नाही याची खबरदारी घेतोय.
 - प्रफुल्ल ढवळे
 शाखा अभियंता, पाठबंधारे विभाग, अक्कलकोट

Web Title: The gates of Khanapur dam were flooded at night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.