गोपाळपुरात जमला संतांचा मेळा ; गोपाळकाल्याने आषाढीची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:20 AM2021-07-25T04:20:18+5:302021-07-25T04:20:18+5:30
शनिवारी पहाटे सव्वा दोन वाजता श्री गोपाळ कृष्ण मंदिरात कृष्ण मूर्तीची अभिषेक पूजा व महापूजा झाली. यानंतर मंदिर ...
शनिवारी पहाटे सव्वा दोन वाजता श्री गोपाळ कृष्ण मंदिरात कृष्ण मूर्तीची अभिषेक पूजा व महापूजा झाली. यानंतर मंदिर समितीचे अध्यक्ष दिलीप गुरव, दत्तात्रय उर्फ गुंडू गुरव, उद्धव गुरव, मनोज गुरव, शांतीनाथ गुरव, संभाजी गुरव, आदित्य गुरव, अतुल गुरव, रवी गुरव यांनी देवाला दहीकाल्याचा प्रसाद दाखवला. यानंतर पारंपरिक पद्धतीने गोपाळकाल्याला सुरुवात झाली.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची गर्दी होऊ नये, अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पहाटे तीन वाजल्यापासून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. यासाठी प्रांताधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर, पोलीस निरीक्षक किरण अवचर, पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम उपस्थित होते.
-----
मंदिरासमोर कीर्तनासाठी मंडप
गोपाळपूर ग्रामपंचायतीने मंदिर परिसरात श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांना कीर्तन करण्यासाठी मंडप उभारला होता. दक्षता म्हणून अग्निशमन वाहनही तैनात होते. सर्व पालख्यांचे गोपाळपूर ग्रामपंचायतीच्यावतीने यथोचित स्वागत केले. यावेळी सरपंच विलास मस्के, ग्रामसेवक अधिकारी जयकुमार दानोळे, उपसरपंच विक्रम आसबे, सदस्य उदय पवार, सचिन आसबे, अजय जाधव, अतुल गुरव, अरुण बनसोडे, बापू लेंगरे, पांडुरंग देवमारे, दीपक सुरवसे उपस्थित होते.
-----
असा होता पोलीस बंदोबस्त
डीवायएसपी ०२, पोलीस निरीक्षक ०८, सहाय्यक पोलीस निरीक्षक ३८, पोलीस अंमलदार १६०, गामकमांडो ५०, एसआरपीएफ ०२ कंपनी, आरसीपी पथक ०१ असा पोलीस बंदोबस्त गोपाळपूर येथे गोपाल काल्यासाठी लावण्यात आला असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली.
-----
फोटो : गोपाळपूर येथील काल्याचा कार्यक्रम झाल्यानंतर परतताना श्री संत तुकाराम महाराजांची पालखी. दुसऱ्या छायाचित्रात श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी. : (छाया - सचिन कांबळे)
----