पेहेत जिजाऊ आणि सावित्रीबाईंच्या रूपात अवतरल्या गौराई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:26 AM2021-09-15T04:26:38+5:302021-09-15T04:26:38+5:30
करकंब : रंगीबेरंगी छत.. विद्युत रोषणाईचा झगमगाट... विविध खेळणी, फळे, मिठाई आणि महापुरुषांच्या पुस्तकांची केलेली आरास हे कोणते पुस्तक ...
करकंब : रंगीबेरंगी छत.. विद्युत रोषणाईचा झगमगाट... विविध खेळणी, फळे, मिठाई आणि महापुरुषांच्या पुस्तकांची केलेली आरास हे कोणते पुस्तक भांडार नाही, तर पेहे येथील प्रा.मारुती गायकवाड परिवारांनी जुन्या रूढी-पंरपरेनुसार मूर्तिरूपी ज्येष्ठां गौराईंच्या पूजनाला फाटा देत, राजमाता जिजाऊ आणि सावित्रीबाई या आधुनिक गौराईंच्या प्रतिमेचे पूजन करून, गौराईचा आगळा वेगळा सण साजरा करत सामाजिक संदेश दिला.
भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सणाला महत्त्व आहे. रूढी-परंपरा आहेत. बहुतांश सणाला आध्यात्मिकतेचा ज्या पद्धतीने वास आहे, त्याच पद्धतीने वैज्ञानिकतेचाही रंग दडलेला आहे. जुन्या काळात नागरिक वैज्ञानिक दृष्टिकोनाकडे दुर्लक्ष करीत असल्याने, बहुधा अशा प्रत्येक बाबतीत आध्यात्मिकतेची सांगड घातल्याने, नागरिकांकडून कोडकौतुक करून उत्साहाने सण साजरा केले जात आहेत परंतु पेहे येथील मारुती गायकवाड परिवारांनी मागील तीन वर्षांपासून जुन्या रूढी-परंपरेला छेद देत, ज्येष्ठा गौराईच्या सणादिवशी राजमाता जिजाऊ आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई या आधुनिक गौराईंचे पूजन करण्याची प्रथा सुरू केली आहे.
गायकवाड यांनी आधुनिक गौराईच्या पुढे विविध थोर महापुरुष, समाजसुधारकांच्या पुस्तकांची आरास करून शिका आणि संघटित व्हा, तरच सर्व जातीधर्माची क्रांती होईल, अशा प्रकारचा सामाजिक संदेश दिला आहे.