अनुराधा नक्षत्रावर उद्या केव्हाही गौरी आवाहन करता येईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 05:52 PM2017-08-28T17:52:39+5:302017-08-28T17:54:28+5:30
सोलापूर दि २८ : लक्ष्मी अर्थात गौरींचे मंगळवार दि. २९ आॅगस्ट रोजी अनुराधा नक्षत्रावर आगमन होत आहे. सोन्या - रूप्याच्या पावलाने येणाºया लक्षींचे स्वागत करण्यासाठी घरोघरी तयारी केली जात आहे.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २८ : लक्ष्मी अर्थात गौरींचे मंगळवार दि. २९ आॅगस्ट रोजी अनुराधा नक्षत्रावर आगमन होत आहे. सोन्या - रूप्याच्या पावलाने येणाºया लक्षींचे स्वागत करण्यासाठी घरोघरी तयारी केली जात आहे.
पंचांगकर्ते मोहन दाते यांनी यासंदर्भात सांगितले की, मंगळवारी अनुराधा नक्षत्रावर केव्हाही गौरी आवाहन करता येणार आहे. ज्येष्ठ नक्षत्रावर ३० आॅगस्ट रोजी गौरीपूजन व भोजन असून, गुरूवार दि. ३१ आॅगस्ट रोजी मूळ नक्षत्रावर गौरी विसर्जन आहे. त्यानंतर परंपरेनुसार दोरे घेता येतील, असे ते म्हणाले.
गणेशोत्सवाचा आनंद व्दिगुणित करणारा हा सण महाराष्टÑात मोठ्या भक्तीभावाने साजरा केला जातो. नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने परगांवी असलेले लोक आवर्जुन महालक्ष्मीच्या सणासाठी आपल्या मूळ घरी येतात. तेथे सहकुटुंब हा सण साजरा केल्यानंतर गौरी विसर्जनानंतर आपल्या कामाच्या गावी परतात. गौरीपूजनाच्या आधी या काळात शेतामध्ये पिकणाºया सर्व पालेभाज्या आणि फळभाज्या गौरीच्या महानैवद्यासाठी आवर्जुन करण्याची पध्दत आहे. याशिवाय गौरी आगमनाच्या दिवशीच फराळाच्या पदार्थही गौरीसमोर ठेवले जातात. घरोघरी हे पदार्थ केले जात असले तरी हल्ली बाजारात ते तयार मिळत आहेत.
गौरींचे मुखवटे खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत गर्दी दिसत असली तरी यंदा वस्तू - सेवा कराची अंमलबजावणी आणि तत्पूर्वी झालेल्या नोटाबंदीमुळे बाजारात मंदी असल्याचे व्यापाºयांकडून सांगण्यात आले. मुख्यवट्यांचा दर ८०० रूपयांपासून १८०० रूपयांपर्यंत आहे. पेणहून आलेले मुखवटे स्थानिक कलाकाराने बनविलेल्या मुखवट्यांपेक्षा किंमतीने अधिक आहेत. गौरीपुढे मांडण्यात येणाºया सजावटीचे साहित्य तर हल्ली सोलापुरात पदपथांवर विक्रीसाठी ठेवण्यात आले असून, तेथे चार खेळण्यांचा सेट १५० ते २५० रूपयांपर्यंत उपलब्ध आहे.