दुपारनंतर करा गौरीचे आवाहन, पंचांगकर्ते मोहन दाते
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 03:42 AM2020-08-21T03:42:25+5:302020-08-21T03:43:06+5:30
दुपारी १ वाजून ५० मिनिटानंतर कधीही गौरीचे आवाहन करता येईल, अशी माहिती पंचांगकर्ते मोहन दाते यांनी सांगितले़
सोलापूर : ज्येष्ठा गौरींचे मंगळवार २५ आॅगस्टला घरोघरी आगमन होत आहे. गणपतीबरोबरच महालक्ष्मी किंवा गौरी आगमन आणि दुसऱ्या दिवशी पूजन हा मोठा सोहळा महाराष्ट्रातल्या अनेक घरांमध्ये होत असतो. दुपारी १ वाजून ५० मिनिटानंतर कधीही गौरीचे आवाहन करता येईल, अशी माहिती पंचांगकर्ते मोहन दाते यांनी सांगितले़
२५ आॅगस्ट रोजी अनुराधा नक्षत्रावर म्हणजे दुपारी १ वाजून ५९ मिनिटानंतर गौरी आवाहन करता येणार आहे़ ज्येष्ठा नक्षत्र असलेल्या दिवशी पूजन करायचे असल्याने बुधवार २६ रोजी नेहमीप्रमाणे गौरी पूजन करावे आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन करावयाचे असल्याने गुरूवार, २७ आॅगस्ट रोजी दुपारी १२ वाजून ३७ मिनिटानंतर गौरी विसर्जन करावे, असेही पंचागकर्ते दाते यांनी सांगितले़