चरबी अन् शरीरातील कॉलेस्टेराॅल कमी करण्यासाठी गावरान लसूण अधिक गुणकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2021 07:33 PM2021-12-10T19:33:45+5:302021-12-10T19:34:31+5:30

वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला; गावराण लसूण फक्त औषधापुरतेच

Gavaran Garlic is more effective in reducing fat and cholesterol in the body | चरबी अन् शरीरातील कॉलेस्टेराॅल कमी करण्यासाठी गावरान लसूण अधिक गुणकारी

चरबी अन् शरीरातील कॉलेस्टेराॅल कमी करण्यासाठी गावरान लसूण अधिक गुणकारी

googlenewsNext

सोलापूर : शंभर रुपयाला अडीच किलो दराने संकरित लसणाची विक्री करणाऱ्या गाड्या शहरात ठिकठिकाणी दिसून येत आहेत. या पार्श्वभूमीवर गावरान लसूण आपल्या आहारातून निघून गेला असून तो औषधापुरताच शिल्लक राहिल्याचे वास्तव चित्र पाहवयास मिळत आहे. चरबी अन् शरीरातील कोलेस्टेराॅल कमी करण्यासाठी लसून गुणकारी चरबी अन् शरीरातील कोलेस्टेराॅल कमी करण्यासाठी लसून गुणकारी असल्याचा दावा वैद्यकीय तज्ज्ञांनी केला आहे.

बाजार समितीच्या ठोक विक्रेत्यांपासून ते सर्व भाजी मंडईतील किरकोळ विक्रेत्यांकडे परराज्यातून येणाऱ्या या संकरित लसणाची चलती असल्याचे दिसून आले. गावराण लसणासाठी शहरातील सर्व मंड्या आणि किराणा दुकानातून विचारणा केली असता तो केव्हाच हद्दपार झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. जिल्ह्यातील शेतकरी स्वतः च्या कुटुंबाला लागेलअसे पाव ते अर्धा गुंठा एवढेच लसणाची लागवड करत असल्याचे निर्दशनास आले आहे सोलापुरात येणारा लसूण पूर्णपणे संकरित असून मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान या राज्यातून येतो. सोलापूरच्याबाजार समितीत मागील पंधरा वीस वर्षांत कधीच गावराण लसूण विक्रीसाठी आले नसल्याचे येथील सर्वात जुने व्यापारी साहिर आडते यांनी सांगितले.

संकरित लसणाचे मीडियम, पूणालड्डू, साधा लड्डू, फुलगोला आणि पाकळी असे चार प्रकार असून त्याच्या किंमती प्रतिक्विंटल पंधराशे ते चार हजार रुपये इतके आहेत. बाजार समितीतील आडते आणि शहरातील सर्व व्यापाऱ्यांकडून दररोज सहाशे क्विंटल संकरित लसणाची विक्री होते. त्या तुलनेत गावरान लसूण एखाद्या शेतकऱ्यांकडून अगदी थोड्या प्रमाणात विक्रीस आणले जाते.

-----------

गुजरात, राजकोट, जामनगरचा लसूण सोलापुरात...

संकरित लसणामध्ये गुजरात, राजकोट, गोंडल, जामनगर येथून आलेल्या मालाला चांगली मागणी आहे. गावरान लसूण पूर्णतः औषधी असल्याने शेतकरी त्याचे महत्त्व ओळखून स्वतःसाठी त्याची लागवड करताना दिसून येतात. क्वचित प्रसंगी एखाद्या शेतकरी मंडईत किलो ते पाच किलो एवढ्या प्रमाणात विक्रीस आणतात .त्याचे दर साधारणपणे दोनशे ते अडीचशे रुपये इतके असतात.

------------

दक्षिण सोलापूर तालुक्यातील दिंडूर येथील मी शेतकरी असून दरवर्षी प्रमाणे यंदाही अर्धा गुंठा गावरान लसणाचे पीक घेतले आहे. त्याची विक्री न करता नातलग कुटुंबीयांना त्याचे वाटप करते. फिकट जांभळ्या रंगाचा ह्या लसणाच्या पाकळ्या फोडणीच्या वेळी मात्र त्याचा घमघमाट फार असतो. चवीला फारच तिखट असतो. आम्ही ते पाल्यासह घरात बांबूला बांधून ठेवतो. गरजेप्रमाणे त्याचा वापर करतो.

-सुशीलाबाई विठ्ठल दिंडोरे, शेतकरी दिंडूर (ता. द. सोलापूर)

---------

जंगली लसणाला चांगली मागणी...

शरीराला अनावश्यक असलेली चरबी आणि कोलेस्टेराॅल कमी होण्यासाठी जंगली लसूण फार उपयुक्त आहे. याला एक कळी लसूण असेही म्हणतात. पंजाबमधील अमृतसर येथून हे लसूण येतात. डॉक्टरांकडून ही याला पसंदी असून ते चिठ्ठी लिहून रुग्णांना ते घेण्यासाठी प्रवृत्त करतात. साधारणतः २५०० रुपये किलो या लसणाचा दर आहे. सकाळी आणि संध्याकाळी दोन पाकळ्या खाल्या तरी त्याचा परिणाम दिसून येतो, याला जाणकार ग्राहकांची मागणी आहे.

- भारत गोटे, वनौषधी विक्रते

Web Title: Gavaran Garlic is more effective in reducing fat and cholesterol in the body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.