परीक्षा दिली, पात्र झालो कामावर कधी बोलावणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:20 AM2021-07-25T04:20:07+5:302021-07-25T04:20:07+5:30
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या सहा विभागांतील सुमारे ७ हजार जागांकरिता ही भरती प्रक्रिया पार पडली ...
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या सहा विभागांतील सुमारे ७ हजार जागांकरिता ही भरती प्रक्रिया पार पडली होती. त्यात ठाणे विभागातीलही चालक कम वाहक पदांच्या १ हजार ३२ जागांचाही समावेश होता. ठाणे विभागातील जागेकरिता उमेदवारांची लेखी परीक्षा २ जुलै २०१७ रोजी घेण्यात आली होती. एसटीची परीक्षा पास होऊन व नोकरीसाठी पात्र असतानाही गेल्या चार वर्षांपासून त्यांना नियुक्तीपत्रच मिळाले नसल्याने ते मिळेल तिथे काम करीत आहेत.
याबाबत पत्रव्यवहार करूनही एसटी विभागाकडून विचारधीन असल्याचे उत्तर मिळत आहे. विद्यमान मंत्री अनिल परब यांनी यात लक्ष घालून आम्हाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी निवड झालेला उमेदवार इलाही इसाक पठाण यांनी पात्र उमेदवारांच्या वतीने वरिष्ठांकडे केली आहे.
----