गीता झळकीस शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:20 AM2021-05-01T04:20:45+5:302021-05-01T04:20:45+5:30
चपळगाव : दुधनी येथील मातोश्री लक्ष्मीबाई सातलिंगप्पा म्हेत्रे प्रशालेची विद्यार्थिनी गीता प्रभू झळकी या विद्यार्थिनीला राज्य शासनाचा छत्रपती ...
चपळगाव : दुधनी येथील मातोश्री लक्ष्मीबाई सातलिंगप्पा म्हेत्रे प्रशालेची विद्यार्थिनी गीता प्रभू झळकी या विद्यार्थिनीला राज्य शासनाचा छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार प्राप्त झाला आहे. सन २०१९-२० मध्ये दहावी शैक्षणिक वर्षात ८५.८० टक्के गुणांनी उत्तीर्ण होऊन शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. या निकालाची दखल घेत यावर्षीच्या महाराष्ट्र राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभाग सोलापूर यांच्या वतीने अनुसूचित जाती प्रवर्गातून गीता झळकी हिला गुणवत्ता पुरस्कार जाहीर झाला. पाच हजार रोख असे पुरस्काराचे स्वरुप आहे. या यशबद्दल म. नि. प्र. डॉ. शांतलिंग महास्वामी, संस्थेचे अध्यक्ष शंकर म्हेत्रे, उपाध्यक्ष वैशालीताई म्हेत्रे, सचिव प्रथमेश म्हेत्रे, खेड, रामा गद्दी,
मुख्याध्यापक व शिक्षकांनी कौतुक केले.
---
३० गीता झळकी