बँक, इन्शुरन्स कंपन्यांमध्ये नोकरी मिळवा -अेविस कॉम्प्युटर्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:17 AM2021-06-02T04:17:52+5:302021-06-02T04:17:52+5:30

भारतामध्ये बँकिंग, फायनांशिअल सर्व्हिसेस अँड इन्शुरन्स (BFSI) क्षेत्रात सध्या ४.२१ कोटी लोक काम करत आहेत. यांच्या सहयोगी संस्था आणि ...

Get a job in a bank or insurance company - Avis Computers | बँक, इन्शुरन्स कंपन्यांमध्ये नोकरी मिळवा -अेविस कॉम्प्युटर्स

बँक, इन्शुरन्स कंपन्यांमध्ये नोकरी मिळवा -अेविस कॉम्प्युटर्स

Next

भारतामध्ये बँकिंग, फायनांशिअल सर्व्हिसेस अँड इन्शुरन्स (BFSI) क्षेत्रात सध्या ४.२१ कोटी लोक काम करत आहेत. यांच्या सहयोगी संस्था आणि तेथे काम करणाऱ्यांची संख्या किमान ३.५ कोटीच्या घरात आहे. फक्त येत्या वर्षातच साधारण १.६ कोटी नवीन कर्मचारी या क्षेत्रात कार्य करण्यासाठी लागणार आहेत. महाराष्ट्र ज्ञान महामंडळ व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ प्रमाणित सर्टिफिकेट इन बँकिंग, फायनांशिअल सर्व्हिसेस अँड इन्शुरन्स हा बीएफएसआय क्षेत्रातील एकमेव अधिकृत कोर्स आहे. अधिक माहिती मिळवण्यासाठी संस्थेचे संचालक अविनाश मठपती यांच्याशी संपर्क साधून डिटेल प्रेझेंटेशन मिळवा, या कोर्सचे महत्त्व जाणून घ्या, मगच प्रवेश निश्चित करा.

जाणून घ्या हा कोर्स कोणास व का उपयुक्त आहे... नोकरी मिळवण्यासाठी- मल्टिनॅशनल बँक, को-ऑपरेटिव्ह बँक्स्, कमर्शिअल बँक्स्, पतसंस्था, मल्टिस्टेट पतसंस्था, क्रेडिट सोसायट्या, इन्शुरन्स कंपन्या, म्युच्युअल फंड व इतर गुंतवणूक सल्लागार कंपन्या, कर सल्लागार कंपन्या, फॉरेन एक्सचेंज सर्व्हिस प्रोव्हायडर्स, सहकारी संस्था, स्टॉक आणि शेअर मार्केटसंबंधित कंपन्या, सर्व प्रकारच्या व्यावसायिक कंपन्या, इंडस्ट्रीज, रिटेल मार्केट व इतर सर्वच आस्थापनांमध्ये नोकरीच्या संधींसाठी सर्वोत्तम कोर्स आहे. बढतीसाठी, स्वयंरोजगारासाठी - बँकिंग, फायनांशिअल सर्व्हिसेस आणि इन्शुरन्स क्षेत्रात सध्या कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अधिक ज्ञान प्राप्त करून व मान्यताप्राप्त प्रमाणपत्र मिळवून बढती मिळवण्यासाठी एकमेव प्रशिक्षण योजना आहे. इन्शुरन्स एजंटसाठी द्यावी लागणारी परीक्षा सोपी जावी म्हणून उपयुक्त कोर्स. सर्वोत्तम नोकरी मिळवण्यासाठी हा कोर्स उपयुक्त आहे. बँकिंग, फायनांशिअल सर्व्हिसेस आणि इन्शुरन्स क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी इतरही उपयुक्त कोर्सेस अविसमध्ये उपलब्ध आहेत. जसे टॅली वीथ जीएसटी, ॲडव्हान्सड् एक्सेल, इंग्लिश स्पिकिंग, सॉफ्टस्किल्स, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, एमएस-सीआयटी ई. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी त्वरित विजापूर रोड, सोलापूर येथील अविस कॉम्प्युटर्स येथे संपर्क साधावा.

Web Title: Get a job in a bank or insurance company - Avis Computers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.