रोजगार, स्वस्त घरे मिळावीत अन् महागाई रोखावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 01:23 PM2019-06-01T13:23:46+5:302019-06-01T13:27:10+5:30
सोलापूरकरांनी व्यक्त केल्या मोदी सरकारकडून अपेक्षा
सोलापूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने सार्वत्रिक निवडणुकीत यश मिळविल्यानंतर राष्टÑपती भवनाच्या प्रांगणातील दिमाखदार सोहळ्यात मोदी मंत्रिमंडळाचा शपथविधी समारंभ झाला. आता सर्वसामान्य सोलापूरकर नागरिकांनी या सरकारकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. मोदी सरकारने मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती केली पाहिजे. ज्यांच्या घरांचे स्वप्न पूर्ण झालेले नाही, त्यांना स्वस्तात घरे मिळावे आणि महत्त्वाचे म्हणजे महागाई कमी व्हावी, या अपेक्षा व्यक्त झाल्या.
‘लोकमत’ टीमने विविध क्षेत्रातील व्यक्तींशी यासंदर्भात संवाद साधला. यामध्ये युवक, महिला, नोकरदार आणि व्यावसायिकांचा सहभाग होता. मोदी सरकारच्या दुसºया कार्यकाळात विकासाचा आलेख उंचावणे आवश्यक आहे. भारत हा विकसनशील देश न राहता विकसित देश झाला पाहिजे. देशात गरिबीचे प्रमाण अधिक आहे. या स्थितीत स्वस्ताई निर्माण झाली पाहिजे, अशा भावना व्यक्त झाल्या.
तरुणांना नोकºया मिळाव्यात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणानुसार युवकांनी मोदी यांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आगामी पाच वर्षांच्या काळात बेरोजगार तरुणांना नोकºया मिळतील, त्यांना रोजगार मिळेल असे निर्णय घेणे आवश्यक आहे. तरुणांच्या हाताला काम मिळाले तरच देशाचा खºया अर्थाने विकास होणार आहे. २0२२ पर्यंत देशातील बेरोजगारीची समस्या दूर व्हावी. सरकारी सेवेत आर्थिक दुर्बलांना सामावून घेण्यात यावे. त्यांची शैक्षणिक पात्रता नाही, अशा बेरोजगारांना व्यवसाय व उद्योेग धंदा सुरू करण्यासाठी प्रशिक्षण, वित्तपुरवठा करण्यात यावा. यासाठी ग्रामीण भागात मोहीम सुरू करणे आवश्यक आहे.
- जगदीश अळ्ळीमारे, शिक्षक
सर्वांसाठी घरे योजना व्हावी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन २0२0 पर्यंत सर्वांसाठी घरे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. या योजनेला मागील पाच वर्षांत सुरुवातही झाली आहे; मात्र अजूनही शहरी व ग्रामीण भागात बेघरांची संख्या जास्त आहे. त्यामुळे शहराच्या ठिकाणी अनधिकृत घरांची संख्या वाढत आहे. देशातील प्रत्येक कुटुंबाला त्यांचे हक्काचे घर असावे ही रास्त अपेक्षा आहे. घर बांधणे म्हणजे सर्वसामान्यांसाठी अत्यंत खर्चिक व आव्हानाची बाब आहे. त्यामुळे केंद्र शासनाने बेघर कुटुंबांना रास्त दरात घरे मिळतील, त्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण ठरेल असे काम मोदी सरकारकडून होणे अपेक्षित आहे. असे झाले तरच विकासाचा आलेख वाढणार आहे.
- अविनाश वळसंगकर, व्यावसायिक
महागाई कमी व्हावी
मागील पाच वर्षांत मोदी सरकारने बºयापैकी सुधारणा करून देशवासीयांना खूश करण्याचे काम केले आहे. दरम्यान, देशातील सर्वसामान्य जनता विद्यार्थी, नोकरदारांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात मोदी सरकारला म्हणावे तसे यश आले नाही. मोदी पर्व २ मध्ये तरी या सरकारने बेरोजगार, शेतकरी, उद्योेग वाढ, महागाई कमी करणे यावर भर द्यावा हीच मापक अपेक्षा.
- अमित कामशेट्टी, व्यावसायिक
नद्या जोड प्रकल्प करावाच
वर्षानुवर्षे शेतकºयांना शेती व्यवसाय नुकसानीचा ठरत आहे. उत्त्पन्न तर सोडाच उलट दरवर्षी कर्जाचा डोंगर वाढत असल्याने शेतकºयांच्या आत्महत्या होत आहेत. त्यामुळे शेतकºयांना शाश्वत सिंचनाची व्यवस्था निर्माण करणे ही काळाची गरज झाली आहे. याच आशेवर शेतकºयांनी मोदी सरकारवर पुन्हा विश्वास दाखविला आहे. नद्या जोड प्रकल्प पूर्णत्वास आला तर शेतकºयांच्या पिढ्यानपिढ्याचा उद्धार होणार आहे; मात्र हा प्रश्न मागील अनेक राज्यकर्त्यांनी बाजूला सारला आहे. मोदी सरकारकडे शेतकºयांची ही प्रमुख मागणी असून ही एकच अपेक्षा जरी पूर्ण झालीतरी खूप मोठे काम होणार आहे.
- इरेशा शेळगे, शेतकरी
बेरोजगारी हटावी
युवकांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे नोकºया मिळत नाहीत. याशिवाय जर कोणी आपला व्यवसाय सुरू करणार असेल तर त्यांना बँकेकडून सहज कर्ज उपलब्ध होत नाही. या कारणामुळे युवकांमध्ये सरकारच्या पॉलिसीबाबत नाराजी वाढत आहे. मागील पाच वर्षात काय झाले यावर विचारमंथन करण्यापेक्षा यावर्षी काय काय करावे, यावर विचारविनिमय व्हावा़ मोदी सरकारच्या दुसºया टर्ममध्ये युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न सुटावा, हीच माफक अपेक्षा़
- मुनाफ शेख, विद्यार्थी
गरिबांना दिलासा मिळावा
जनतेने जी सत्ता दिली आहे तो हक्क नाही तर एक जबाबदारी आहे आणि ती पार पाडली पाहिजे, या भावनेने सरकारने काम करावे. अहंकार आला आणि तुम्हीही तेच केले जे आधीच्या लोकांनी केले तर जनता तुम्हाला ज्या वेगाने वर नेले त्याच वेगाने खाली आपटेल, याचा कधीही विसर पडू देऊ नये. सर्वसामान्य जनतेबरोबरच युवक, महिलांच्या विविध अपेक्षा आहेत त्या पूर्ण करून देशातील गरीब जनतेला दिलासा द्यावा़ बेरोजगारी, शेतकºयांच्या वाढत्या आत्महत्या, दुष्काळात मदत यावर भर द्यायला हवा़
- मयूर गिरे, विद्यार्थी
ग्रामीण जीवन उंचावावे
राज्यातील शेतकºयांच्या नक्की काय समस्या आहेत आणि कशाने आत्महत्येला प्रवृत्त होतात ते जाणून घेऊन त्यावर त्वरित उपाययोजना करण्यात यावी. नुसत्या घोषणा नव्हे. शिवाय विविध जाती-धर्मांना आरक्षण देण्याचे आश्वासन शासनाने दिले होते, त्याची पूर्तता करण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करावा़ बेरोजगारी, वीज समस्या, रस्ते, वाहतूक सुधारण्यावर भर देण्यात यावा़ ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी मदत होईल अशा योजना सुरू करून त्या अमलात आणाव्यात़
- प्रदीप पाटील, नोकरदार