जागा मिळेल, घरकूल देऊ, मात्र अवैध धंदे सोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:24 AM2021-09-23T04:24:56+5:302021-09-23T04:24:56+5:30
करकंब पोलीस स्टेशनअंतर्गत आदिवासी समाजपरिवर्तन बैठक देशमुख मळा येथे पार पडली. प्रारंभी, शहीद बुरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात ...
करकंब पोलीस स्टेशनअंतर्गत आदिवासी समाजपरिवर्तन बैठक देशमुख मळा येथे पार पडली. प्रारंभी, शहीद बुरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायतीतर्फे समाजाला संपूर्ण सहकार्य करून विविध योजनांचा लाभ मिळवून देऊ. ग्रामपंचायतच्या माध्यमातून व्यवसायासाठी जागा, दुकानासाठी गाळे, घरकुल आदी मिळवून देणार असल्याचे प्रा. सतीश देशमुख व माजी ग्रा.पं. सदस्य सचिन शिंदे यांनी सांगितले. यावेळी आवश्यक जातीचे दाखले, दुकानाचे परवाने, उत्पन्नाचे दाखले व इतर आवश्यक कागदपत्रांची माहिती देण्यात आली. सर्व कागदपत्रे प्रशासन व महा ई-सेवा केंद्र चालक हे माफक दरात काढून देणार असल्याचे अतुल अभंगराव यांनी सांगितले.
यावेळी समाजाचे अध्यक्ष भारत काळे यांनी स्व. आर.आर. पाटलांची आठवण करून दिली. आबांनी आमच्या समाजासाठी चांगला प्रयत्न केला आणि आज आबा असते, तर समाज वंचित राहिला नसता, अशी खंत व्यक्त केली. यावेळी ग्रा.पं. सदस्य सावता खारे, महिबूब बागवान, कालिदास काळे, भारत काळे, व्यंकट काळे, विठ्ठल काळे, रावजी काळे, पप्पू काळे, संजय काळे, अजय काळे, सोमनाथ काळे, बबलू काळे, पोकॉ हरिहर, रमेश फुगे, शेटे, गर्जे आदींची उपस्थिती होती.
.........................
मुलांना चांगले शिक्षण देऊन उद्योजक बनवा
सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या ऑपरेशन परिवर्तन मोहिम राबविण्यात येत आहे. या माध्यमातून अवैध हातभट्टी दारू व्यवसाय बंद करून किराणा, दुग्ध व्यवसाय, शेती व इतर व्यवसाय करण्याबाबत, तसेच शासनाच्या विविध योजना व आपल्या समाजात परिवर्तन करून मुलांना चांगले शिक्षण देऊन उद्योग व्यवसायात प्रयत्न करण्याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश तारू व पोलीस उपनिरीक्षक अजित मोरे यांनी मार्गदर्शन केले.