शेतकऱ्यांची थकीत सर्व कामे निकाली काढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:24 AM2021-02-11T04:24:07+5:302021-02-11T04:24:07+5:30

मोडनिंब येथे महाराजस्व अभियानांतर्गत आयोजित केलेल्या फेरफार अदालतमध्ये ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, आमदार बबनराव शिंदे, आमदार ...

Get rid of all the weary work of the farmers | शेतकऱ्यांची थकीत सर्व कामे निकाली काढा

शेतकऱ्यांची थकीत सर्व कामे निकाली काढा

Next

मोडनिंब येथे महाराजस्व अभियानांतर्गत आयोजित केलेल्या फेरफार अदालतमध्ये ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, आमदार बबनराव शिंदे, आमदार राजेंद्र राऊत, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, प्रांताधिकारी ज्योती कदम, उदयसिंह भोसले, शाम पवार, हेमंत निकम, सचिन ढोले यांच्यासह माढा ,करमाळा, मोहोळ, पंढरपूर या तालुक्यातील नायब तहसीलदार मंडलाधिकारी व तलाठी तसेच जिल्हा माहिती अधिकारी राऊत, पंचायत समितीचे सभापती विक्रमसिंह शिंदे, जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष कैलास तोडकरी, संतोष पवार व शेतकरी उपस्थित होते.

यावेळी माढा, करमाळा, मोहोळ, पंढरपूर या तालुक्यातील २० शेतकऱ्यांना जागेवर दाखले देण्यात आले. तसेच कोविड कालावधीत ज्या गावाने लोकोपयोगी काम केले त्या गावातील युवकांना व मोडनिंब ग्रामपंचायतीला कोविड योद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी मोडनिंब एमआयडीसीचे प्रलंबित कामास तत्काळ गती यावी व त्याची मंजुरी मिळावी यासाठी विशाल मेहता, शंभू मोरे, कैलास तोडकरी यांनी पालकमंत्र्यांना निवेदन दिले.

फोटो

१०मोडनिंब०१

मोडनिंब येथे आयोजित राजस्व अभियानांतर्गत फेरफार अदालत कार्यक्रमाप्रसंगी शेतकऱ्यांना फेरफार वाटप करताना पालकमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, आमदार बबनराव शिंदे, आमदार राजेंद्र राऊत, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे.

Web Title: Get rid of all the weary work of the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.