Maharashtra Election 2019; विकासाचा अजेंडा नसलेल्या सरकारला सत्तेपासून दूर करा : प्रकाश आंबेडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 01:19 PM2019-10-14T13:19:55+5:302019-10-14T13:22:22+5:30
करमाळ्यात वंचित बहुजन आघाडीची जाहीरसभा
करमाळा : गेल्या पाच वर्षांत राज्यात भाजप-सेनेचे सरकार आपले नव्हते. आपले सरकार कोणाला म्हणावयाचे ? जे सरकार सत्तेवर आल्यावर संकटाच्या वेळी जनतेसाठी धावून येते. गेल्या पाच वर्षांत राज्यामध्ये ज्या ज्या वेळी जनतेवर संकटे आली त्या वेळी हे सरकार धावून आले नाही. या सरकारसमोर विकासाचा कोणताच अजेंडा नाही. त्यामुळे या सरकारला सत्तेपासून दूर करा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले.
करमाळा येथे आले असता आंबेडकर बोलत होते. प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादी पक्ष नालायक आहेत, हे खरे आहे. मात्र गेल्या पाच वर्षांमध्ये तुम्ही काय केले ते सांगा, असा भाजप-शिवसेनेला टोला लगावला़ तुमच्याकडे विकासाचा अजेंडा नसल्यामुळे तुम्ही फक्त देशभक्तीच्या गप्पा मारत देशातील जनतेला वेठीस धरून त्यांची पिळवणूक करत आहात. देशातील व राज्यातील विरोधक संपविण्याचे काम एका बाजूला तुम्ही करत असताना दुसºया बाजूला चळवळीमध्ये काम करणाºया व्यक्तींवर खोटेनाटे आरोप करून त्यांना जेलमध्ये टाकण्याचे काम करत आहात, असे त्यांनी सांगितले.
सोलापूर जिल्ह्याचे हक्काचे पाणी नाहक टाटा व बिर्ला यांना विकण्याचे काम करण्यात आलेले आहे. धरण त्यांनी जरी बांधलेले असले तरी पाणी मात्र आमच्या हक्काचे आहे, असेही आंबेडकर म्हणाले़ यावेळी अतुल खुपसे, अॅड. विजय मोरे, सुभाष ओहोळ, देवा लोंढे यांची प्रमुख उपस्थिती होती़