बेंद ओढ्याची दुर्गंधी हटवा.. आजार पळवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:18 AM2020-12-25T04:18:24+5:302020-12-25T04:18:24+5:30
शहराजवळून सुमारे दोन किलोमीटर लांबीचा एक मोठा बेंद ओढा-नाला गेला आहे. त्याचे रुंदीकरण व खोलीकरण जलसंधारण विभागाने एका फाउंडेशनच्या ...
शहराजवळून सुमारे दोन किलोमीटर लांबीचा एक मोठा बेंद ओढा-नाला गेला आहे. त्याचे रुंदीकरण व खोलीकरण जलसंधारण विभागाने एका फाउंडेशनच्या माध्यमातून केले आहे. त्या ओढ्यालाच कुर्डूवाडी शहरात गावकर नाला म्हणूनही संबोधले जाते. या ओढ्यात शहरातून वाहणाऱ्या दूषित पाण्याच्या गटारी जोडल्या आहेत. त्यामुळे दुर्गंधी नेहमीच घोंगावते. त्याचा त्रास इथल्या जनतेला होत असून, यामुळेच आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे त्या ओढ्याचे शहराच्या भल्यासाठी सुशोभीकरण गरजेचं असल्याची मागणी नागिरकांकडून वारंवार नगरपालिकेकडे होत आहे.
शहरातील पंढरपूररोड ते हिंदू स्मशानभूमी, पंढरपूररोड ते पाणीपुरवठा विहीर व टेंभुर्णीरोड ते पंढरपूर रेल्वेलाइनपर्यंत या बेंद ओढ्याचे शहरालगतचं क्षेत्र आहे. यामध्ये गटारीच्या माध्यमातून वाहून आलेले दुर्गंधीयुक्त साहित्याचे ढिगारे साठले आहेत. या परिसरात येथील परिसरातील जनावरेही चरायला येतात. तेही त्यातील दूषित घटक खाऊन आजारी पडल्याच्या घटना पूर्वी घडल्या आहेत.
या ओढ्याच्या सुशोभिकरण करण्यासाठी कडेला रस्ता निर्माण करणे, पथदिवे लावणे, नव्याने वृक्षलागवड करणे, घाट बांधणे अशी विविध प्रकारांची कामे करावी, अशी शहरवासीयांची मागणी आहे. यासाठी सुमारे पाच कोटी ३८ लाखांची गरज असल्याचे नगरपालिकेतून सांगण्यात आले. नगरपालिकेच्या माध्यमातून संबंधित कामासाठी शासन स्तरावरून निधी मिळावा म्हणून शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय डिकोळे यांनी नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना प्रत्यक्ष भेटून निधीची मागणी केली आहे.
बेंद ओढ्याच्या सुशोभीकरणासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे नगरपालिकेच्या वतीने पाच कोटी ३८ लाखांच्या निधीची मागणी केली आहे. त्यास शासनाकडून लवकरच हिरवा सिग्नल मिळेल अशी अपेक्षा आहे.
-धनंजय डिकोळे, जिल्हाध्यक्ष, पंढरपूर विभाग, शिवसेना
फोटो ओळ-२४क़ुर्डूवाडी-बेंद ओढा
कुर्डूवाडी शहराच्या जवळून जाणारा हाच तो बेंद ओढा. त्यामध्ये घाणीचे ढिगारेच्या ढिगारे साचलेले दिसत आहेत.
===Photopath===
241220\24sol_5_24122020_4.jpg
===Caption===
कुर्डूवाडी शहराच्या जवळून जाणारा हाच तो बेंद ओढा. त्यामध्ये घाणीचे ढिगारेच्या ढिगारे साचलेले दिसत आहेत.