कोरोना लस अन् तपासणी करून घ्या; अन्यथा कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:22 AM2021-04-08T04:22:20+5:302021-04-08T04:22:20+5:30
शासनाच्या निर्देशानुसार अत्यावश्यक सेवेतील हॉटेल, बेकरी, डेअरी, किराणा दुकान, पेट्रोल पंप, भाजीपाला, फळविक्रेत्यांना या कडक निर्बंधामधून वगळले आहे. मात्र ...
शासनाच्या निर्देशानुसार अत्यावश्यक सेवेतील हॉटेल, बेकरी, डेअरी, किराणा दुकान, पेट्रोल पंप, भाजीपाला, फळविक्रेत्यांना या कडक निर्बंधामधून वगळले आहे. मात्र स्वतः मालक, चालक, कामगारांनी तत्काळ कोरोना प्रतिबंधक लस घेणे व तपासणी करून रिपोर्ट स्वतः जवळ बाळगणे गरजेचे आहे. यासाठी तपासणी मोहीम हाती घेतली आहे. यात नियमाचा भंग केल्यास दंड व दुकाने सील करण्यात येणार आहेत.
कोरोना पूर्वीच्या तुलनेत चार पटीने वाढत आहे. लस घेतल्याने त्रास होईल असा नागरिकांच्या मनामध्ये संभ्रम आहे. तो काढून टाकावा. मी स्वतः घेतली आहे. कोणत्याही प्रकारचे त्रास झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. शहरात व ग्रामीण भागात पोलिसांबरोबर महसूल अधिकारी, कर्मचारी यांच्याद्वारे कोरोना नियम न पाळणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात झाल्याचे तहसीलदार मरोड यांनी सांगितले.
----
केंद्रे वाढवली.. लस घ्या, धोका टाळा
अक्कलकोट तालुक्याची लोकसंख्या ३ लाखांच्या घरात आहे. त्यापैकी केवळ ९ हजार लोकांनी कोरोना विरोधी लस घेतली आहे. उर्वरित लोकांनी ती तत्काळ घ्यावी. सध्या ४५ वर्षांवरील लोकांना लस देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. केंद्रे दुपटीने वाढविली आहेत. कोविड केअर सेंटरमध्ये ७० रुग्ण असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. कोरोनाचा धोका टाळण्यासाठी आतापासूनच काळजी घ्यावी, असे आवाहन तहसीलदार मरोड यांनी केले आहे.
---