मोहोळ नगरपरिषदेवर घागरीचं उलटं तोरण; पाण्याच्या मागणीसाठी अनोखे आंदोलन

By Appasaheb.patil | Published: May 31, 2023 04:07 PM2023-05-31T16:07:05+5:302023-05-31T16:07:46+5:30

यावेळी संतप्त मोहोळमधील रहिवांशांनी घागरीचं उलटं तोरण बांधून नगरपालिकेचा निषेध केला.

Ghagr's inverted pylon on Mohol Municipal Council A unique agitation for water demand | मोहोळ नगरपरिषदेवर घागरीचं उलटं तोरण; पाण्याच्या मागणीसाठी अनोखे आंदोलन

मोहोळ नगरपरिषदेवर घागरीचं उलटं तोरण; पाण्याच्या मागणीसाठी अनोखे आंदोलन

googlenewsNext

सोलापूर : मोहोळ शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी मोहोळ नगरपरिषदेसमोर अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी संतप्त मोहोळमधील रहिवांशांनी घागरीचं उलटं तोरण बांधून नगरपालिकेचा निषेध केला.

सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे. तापमानाचा पाराही ४३ अंशाच्या पुढे गेला आहे. वाढत्या तापमानामुळे उकाडा वाढल्याने नागरिक त्रस्त असताना पाण्यासाठी दाहीदिशा फिरावे लागत आहे. नदीला पाणी असूनही नियोजनाअभावी मोहोळचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. शहरवसियांना नियमित व मुबलक पाणी मिळत नाही. ऐन उन्हाळया्त पिण्याच्या पाणी मिळत नसल्यानं नागरिकांनी नगरपालिकेच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. या विस्कळीत पाणीपुरवठ्याला अधिकारी जबाबदार आहेत असा आरोप रमेश बारसकर यांनी केला. याचवेळी नागरिकांनी नगरपालिकेच्याविरोधात घोषणाबाजी करीत मडकीही फोडली.  या घटनेची माहिती मिळताच मोहोळ पोलिस आंदोलनस्थळावर दाखल झाले होते.
 

Web Title: Ghagr's inverted pylon on Mohol Municipal Council A unique agitation for water demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.