सुभाष देशमुख यांच्या भाषणावेळी गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2019 04:39 AM2019-03-07T04:39:30+5:302019-03-07T04:39:35+5:30
सहकारमंत्री सुभाष देशमुख, जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्या उपस्थितीत नामविस्तार सोहळा पार पडला.
सोलापूर : सोलापूर विद्यापीठास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा निर्णय मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आल्यानंतर लागलीच बुधवारी सहकारमंत्री सुभाष देशमुख, जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्या उपस्थितीत नामविस्तार सोहळा पार पडला. पण या कार्यक्रमात सहकारमंत्री सुभाष देशमुख बोलण्यासाठी उभे राहिले. पण बसलेल्या काही कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप करत गोंधळ घातला.
नामविस्तार सोहळाच्या का कार्यक्रमात सहकारमंत्री सुभाष देशमुख बोलण्यासाठी उभे राहिले. ‘सर्वांच्या एकजुटीमुळे सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात आले आहे,’ असे त्यांनी म्हणताच सभामंडपात उजव्या बाजूला बसलेल्या कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप केला. विद्यापीठाच्या नामविस्तारासाठी तुमचे कोणतेही योगदान नाही, साधे पत्रसुद्धा दिले नाही, अशी ओरड करण्यास सुरुवात केली. त्यामुळे देशमुख यांना थोडावेळ थांबावे लागले. कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी पोलीस धावले. कार्यकर्त्यांना शांत केल्यानंतर देशमुख यांनी पुन्हा भाषणाला सुरुवात केली.