पांगरीतील वाचनालयाला स्पर्धा परीक्षा पुस्तकांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:23 AM2021-08-29T04:23:15+5:302021-08-29T04:23:15+5:30
कुसळंब : पांगरी (ता. बार्शी) येथील स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालयाला सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या वतीने ...
कुसळंब : पांगरी (ता. बार्शी) येथील स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालयाला सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या वतीने स्पर्धा परीक्षेची पुस्तके भेट देण्यात आली.
यावेळी हभप प्राध्यापक विलास जगदाळे, डॉक्टर किरण झरकर, प्राध्यापक अशोक सावळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल उपस्थित होते. यावेळी प्राध्यापक जगदाळे यांनी या उपक्रमाला शुभेच्छा देत स्पर्धा परीक्षेची पुस्तके अनेक स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य घडवतील दातृत्वाची आजही समाजात वाणवा नसून गावाचे सौभाग्य वाचनालय असून त्याचा वापर करण्याचे आवाहन केले. पांगरी गाव त्यासाठी दत्तक घेतले आहे. स्कील बुकच्या सर्व संकल्पना पांगरीत राबवून तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करु असे आश्वासन डॉ. किरण झरकर यांनी केले. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष अनिल पाटील, सुधीर तोरडमल, प्रा. अशोक साबळे, विशाल गरड, शहाजी धस, तात्या बोधे, अनिल खुणे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी डॉ. लांडे, रियाज बागवान, सतीश जाधव, मीटू काकडे, गणेश गोडसे, हनुमंत बगाडे, विजयकुमार माळी, शरद देशमुख, सोमनाथ नारायणकर, बाळासाहेब मोरे, विष्णू पवार, गणेश गोडसे, बाबा शिंदे, सचिन ठोंबरे, इर्शाल शेख, किशोर बगाडे उपस्थित होते.
--------
फोटो : २७ पांगरी
पांगरी वाचनालयाला स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांची भेट देताना पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर, प्रा. विलास जगदाळे, डॉ. किरण झरकर, प्रा. अशोक सावळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल.