माळी शुगरला महिला उद्योजकांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:21 AM2021-02-12T04:21:31+5:302021-02-12T04:21:31+5:30
माळीनगर : माळीनगर येथील दि सासवड माळी शुगर फॅक्टरी या खाजगी साखर कारखान्यास पुण्यातील महिला उद्योजकांनी भेट देऊन साखर ...
माळीनगर : माळीनगर येथील दि सासवड माळी शुगर फॅक्टरी या खाजगी साखर कारखान्यास पुण्यातील महिला उद्योजकांनी भेट देऊन साखर उत्पादनाची माहिती घेतली. पुण्यातील मॅग्नोलिया या महिलांच्या ग्रुप प्रमुख नूतन बनकर आणि गौरी ढोले पाटील यांनी ४८ ऊद्योजक महिलांना घेऊन शनिवारी हा दौरा आयोजित केला होता.
कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र गिरमे यांनी या उद्योजक महिलांचे स्वागत केले. १९३२ साली स्थापन झालेल्या कारखान्याच्या वाटचालीची माहिती दिली. या महिला उद्योजकांनी पूर्ण कारखान्यामध्ये फिरुन साखर उत्पादन, वीज निर्मिती प्रकल्प, ग्रेन बेस प्रकल्प तसेच मोल्यसिसपासून इथेनॉल स्पिरीट उत्पादन प्रकल्पाची माहिती घेतली. या महिला उद्योजकांनी कारखाना पाहणीच्या दौऱ्याच्या वेळी नीळकंठ भोंगळे यांच्या महाळुंग येथील सिंधीच्या शेतीला भेट देऊन नीरा उत्पादन व नीरेपासून गुळ निर्मिती प्रकल्पाला भेट दिली. येथील सारंगा गिरमे आणि राजश्री जगताप यांनी हा दौरा घडवून आणला.
----
फोटो : ११ माळीनगर
माळीनगर साखर कारखान्याची पुण्यातील महिला उद्योजकांना माहिती देताना कार्यकारी संचालक राजेंद्र गिरमे