३०० टन क्रेनद्वारे सात तासात बसविले गुलबर्ग्यातील पुलावरील गर्डर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 12:32 PM2020-07-29T12:32:22+5:302020-07-29T12:35:02+5:30
मध्य रेल्वे : गुलबर्गा शहरातील रेल्वे पुलाचे काम पूर्ण; दोनशे कर्मचाºयांच्या ताफ्याने दिले योगदान
सोलापूर : मध्य रेल्वेच्यासोलापूर-वाडी मार्गावर गुलबर्गा-जेवरगी या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे़ गुलबर्गा शहरातून जाणाºया या महामार्गावरील रेल्वे पूल उभारणीचे काम पूर्ण करण्यात आले़ ३०० टन क्रेनद्वारे सात तासात सात गर्डर बसवून हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला़ दोन दिवसांच्या या कामासाठी १५० ते २०० कर्मचाºयांचा ताफा वापरण्यात आल्याचे रेल्वेच्या अधिकाºयांनी सांगितले.
लॉकडाऊन काळात प्रवासी रेल्वे गाड्या बंद असल्याचा फायदा घेत रेल विकास निगम लिमिटेडच्या वतीने सोलापूर विभागातील दुहेरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे़ प्रलंबित असलेली सर्व कामे पूर्ण करण्यासाठी रेल विकास निगमकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत़ गुलबर्गा शहरातून गुलबर्गा ते जेवरगी हा रस्ता दोन पदरी रस्ता आता चौपदरीकरण करण्यात आला आहे़ या रस्त्यावर पूर्वी दोन रेल्वे ट्रॅक होते, आता चौपदरीकरण कामात रेल्वेने पाच ट्रॅक बनविले आहेत़ शहरातून जड वाहतूक घेऊन जाणाºया वाहनधारकांसाठी रेल्वेने उड्डाण पूल बनविला आहे.
सात गर्डर अन् दोन क्रेन
सोलापूर-वाडी रेल्वे सेक्शन दरम्यान गुलबर्गा शहरात नव्याने उभारण्यात आलेल्या पुलासाठी ३०० टनाचे दोन रोड क्रेन तैनात ठेवले होते़ २५ टनाचे सात गर्डर बसविण्याचे काम हाती घेतले होते़ पहिल्या दिवशी चार तर दुसºया दिवशी दोन गर्डर बसविण्यात आले़ सात तासांच्या या यशस्वी कामामुळे गुलबर्गा ते जेवरगी हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला़
गुलबर्गा शहरातून जाणाºया चौपदरीकरणावर असलेला रेल्वेचा पूल उभारण्यात आला आहे़ हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे़ या पुलामुळे रेल्वे गाड्या आता अधिक वेगाने धावतील़ लॉकडाऊन काळात प्रवासी गाड्या बंद असल्याने सोलापूर विभागातील दुहेरीकरण, विद्युतीकरण व प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत़
- एस. एच. कुलकर्णी,
वरिष्ठ अधिकारी, रेल विकास निगम लिमिटेड, मध्य रेल्वे