आई-वडिलांना मारू नका म्हणणाऱ्या मुलीला घेतला चावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:21 AM2021-04-25T04:21:40+5:302021-04-25T04:21:40+5:30
ताई लिंबाजी कोळेकर व नामदेव बाबा आलदर यांचा जमीन गट क्र. १८३ वरून २०१३-१४ पासून वाद चालू आहे. दरम्यान, ...
ताई लिंबाजी कोळेकर व नामदेव बाबा आलदर यांचा जमीन गट क्र. १८३ वरून २०१३-१४ पासून वाद चालू आहे. दरम्यान, गेल्या पाच ते सहा महिन्यांपूर्वी नामदेव आलदर याच्याकडून सदर गटातील दोन हेक्टर जमीन मारुती आलदर व ज्ञानदेव आलदर यांनी घेऊन त्यांच्या मुलांच्या नावे केली आहे. त्यामुळे ते सदर गटातून रस्ता मागत होते. म्हणून ताई कोळेकर यांनी सदर जमिनीचा कोर्टात वाद चालू आहे. त्याचा निकाल लागू द्या मग बघू, असे सांगितले होते.
२२ एप्रिल रोजी सायं. ४ ते ५ च्या दरम्यान मारुती आलदर, ज्ञानदेव आलदर, सुरज आलदर, इंद्रजीत आलदर, शालन आलदर, धनाजी बंडगर हे सदर जमिनीतील चिलार काढण्यासाठी आले होते. त्या ठिकाणी ताई कोळेकर व लिंबाजी कोळेकर हे त्यांना या जमिनीचा वाद चालू आहे, चिलार काढू नका, असे समजावून सांगत असताना सुरज आलदर याने लिंबाजींची गच्ची धरून खाली पाडले, तर मारुती आलदर तेथेच पडलेल्या लिंबाच्या काठीने मारहाण करू लागला. यावेळी पत्नी ताई कोळेकर या भांडण सोडवण्यासाठी मध्ये आल्या असता मारुती आलदर याने त्यांनाही खाली पाडून त्याच काठीने मारहाण केली. दरम्यान, ज्ञानदेव आलदर, इंद्रजीत आलदर, सुरज आलदर, शालन आलदर, धनाजी बंडगर या सर्वांनी मिळून कोळेकर पती-पत्नीला शिवीगाळ, दमदाटी करत हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.
हा प्रकार पाहून मुलगी पायल कोळेकर माझ्या आई-वडिलांना मारू नका, असे म्हणत असताना धनाजी बंडगर यांनी तिच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला चावा घेऊन जखमी केले. जखमी पती-पत्नी व मुलीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत ताई लिंबाजी कोळेकर यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.