वीजबिल भरण्यास सवलत द्या अन्यथा कार्यालयास टाळे ठोकू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:26 AM2021-08-20T04:26:58+5:302021-08-20T04:26:58+5:30

भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी गुरुवारी शेतकऱ्यांसह सांगोला महावितरण कार्यालयात धाव घेतली. यावेळी त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. ...

Give concessions to pay the electricity bill otherwise lock the office | वीजबिल भरण्यास सवलत द्या अन्यथा कार्यालयास टाळे ठोकू

वीजबिल भरण्यास सवलत द्या अन्यथा कार्यालयास टाळे ठोकू

Next

भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी गुरुवारी शेतकऱ्यांसह सांगोला महावितरण कार्यालयात धाव घेतली. यावेळी त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. लॉकडाऊनच्या काळात सर्व व्यवहार बाजारपेठा, रोजगार ठप्प झाल्याने जनता, शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. वीजबिलाची आकारणी, मीटर रीडिंगमधील त्रुटी, चुकीची वीजबिले आल्याने वीजग्राहकांच्या तक्रारींचा ओघ वाढला आहे. मीटर रीडिंगऐवजी सरासरी वीजबिल दिले आहे. शेतीपंपाची वीजबिले भरण्यासाठी शेतकऱ्यांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे, असे त्यांनी सांगितले.

यामुळे ग्राहकांना टप्प्याटप्प्याने वीजबिल भरण्यास सवलत द्यावी, वीजबिलाव्यतिरिक्त विलंब शुल्क आकारू नये, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी युवा नेते प्रताप घाडगे, शेतकरी संघटना अध्यक्ष बाळासाहेब वाळके, माजी सरपंच संजय घाडगे, माजी उपसरपंच बाळासाहेब घाडगे, सदाशिव माळी, लक्ष्मण वलेकर, यशवंत घाडगे, विजय शिंदे, महादेव पाटील, अजित घाडगे, पांडुरंग जानकर, गणपत बनसोडे, अनिल पवार आदी उपस्थित होते.

फोटो ओळ :

वीजबिल भरण्यास मुदतवाढ देण्याच्या मागणीचे निवेदन महावितरण अधिकाऱ्यांना देताना चेतनसिंह केदार-सावंत यांच्यासह शेतकरी.

Web Title: Give concessions to pay the electricity bill otherwise lock the office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.