नोकरी द्या; नाहीतर इच्छामरणाची परवानगी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:23 AM2021-09-03T04:23:03+5:302021-09-03T04:23:03+5:30

महाराष्ट्र शासनाने १५ जुलै २०१४ साली मराठा समाजाला शैक्षणिक व सामाजिक मागास प्रवर्गातून आरक्षण जाहीर केले होते. त्यानुसार बागेचीवाडी ...

Give the job; Otherwise allow euthanasia | नोकरी द्या; नाहीतर इच्छामरणाची परवानगी द्या

नोकरी द्या; नाहीतर इच्छामरणाची परवानगी द्या

Next

महाराष्ट्र शासनाने १५ जुलै २०१४ साली मराठा समाजाला शैक्षणिक व सामाजिक मागास प्रवर्गातून आरक्षण जाहीर केले होते. त्यानुसार बागेचीवाडी येथील संगीता पवार यांनी आरोग्य सेविकेच्या नोकरीसाठी अर्ज भरला होता. त्यानुसार त्यांची निवड होऊन जाहीर झालेल्या यादीमध्ये त्यांच्या नावाचा समावेशही करण्यात आला. तद्नंतर सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकांमुळे आरक्षण रद्द करण्यात आले; परंतु आरक्षण कालावधीत देण्यात आलेले शैक्षणिक प्रवेश व नोकऱ्या संरक्षित केल्या होत्या. त्यानुसार मला जाहीर झालेली जि.प. आरोग्य विभाग कोल्हापूर यांच्याकडील नोकरी मिळणे न्यायसंगत होते; पण त्यानंतर मला नोकरी देण्यात आली नाही.

सध्या कोणतीही शासकीय नोकरी मिळवण्याची माझी वयोमर्यादा उलटून गेली आहे. माझे पती अपंग आहेत व माझी मुले शिक्षण घेत असल्याने माझी आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. येथून पुढे संसाराचा गाडा मला एकटीने ओढता येणार नाही. त्यासाठी शासनाने दिलेली नोकरी मला मिळावी किंवा शासनानेच मला इच्छामरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी संगीता पवार यांनी राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Web Title: Give the job; Otherwise allow euthanasia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.