आॅनलाईन यंत्रणा कार्यान्वित होईपर्यंत हस्तलिखित उतारे द्या, सोलापूरच्या जिल्हाधिकाºयांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 05:33 PM2018-06-26T17:33:07+5:302018-06-26T17:35:05+5:30
घरबसल्या नागरिकांना ७/१२ उतारा मिळवा या हेतूने शासनाने संगणकीकृत उतारे देण्याची यंत्रणा कार्यान्वित केली.
सोलापूर : सध्या सात-बारा उतारे अद्ययावत करण्याची संगणकीकृत यंत्रणा बंद असल्यामुळे नागरिकांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. जोवर आॅनलाईन यंत्रणा सुरळीत होत नाही तोपर्यंत हस्तलिखित उतारे देण्याची मागणी संभाजी आरमारच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली होती़ याची दखल घेत जिल्हाधिकाºयांनी हस्तलिखित उतारे देण्याचे आदेश उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना सोमवारी दिले आहेत.
घरबसल्या नागरिकांना ७/१२ उतारा मिळवा या हेतूने शासनाने संगणकीकृत उतारे देण्याची यंत्रणा कार्यान्वित केली. मात्र मागील १ महिन्यापासून ही यंत्रणा पूर्णपणे कोलमडून पडली असून, नागरिकांना स्वत:च्या मिळकतीचे उतारे मिळणे अवघड झाले आहे. यंत्रणा बंद पडल्यामुळे खरेदी-विक्री व्यवहार, बँक कर्ज प्रकरणे, जामीनकीची प्रकरणे आदी सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. यंत्रणा बंद पडल्यानंतर तत्काळ पर्यायी यंत्रणा उपलब्ध करून देण्याची तत्परता प्रशासनाने दाखविणे आवश्यक होते.
नागरिकांची गैरसोय लक्षात घेता संभाजी आरमारने जिल्हाधिकाºयांची भेट घेऊन याप्रश्नी तोडगा काढण्याची आग्रही मागणी केली असताना जिल्हाधिकाºयांनी सर्व तलाठ्यांना हस्तलिखित उतारे तत्काळ देण्याचे आदेश दिले. यासंबंधी काही अडचण आल्यास निवासी उपजिल्हाधिकाºयांकडे संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
यावेळी संभाजी आरमारचे अध्यक्ष श्रीकांत डांगे, कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे, जिल्हा संघटक अनंत नीळ, सोमनाथ मस्के, मल्लिकार्जुन पोतदार, गणेश ढेरे, राहुल वाघमोडे, वैभव सुतार, गणेश फत्तेवाले, मिथुन पवार, सुमित सुतार, राजू आखाडे आदी उपस्थित होते.