'लाडकी बहीण ऐवजी कष्ट करणाऱ्यांना पैसे द्या, पैसे नसतील तर राज्यपालांचा बंगला विका'; बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 12:52 PM2024-07-29T12:52:48+5:302024-07-29T12:56:27+5:30

Bachchu Kadu : आमदार बच्चू कडू यांनी राज्य सरकारला 'लाडकी बहीण' योजनेवरुन घरचा आहेर दिला आहे.

'Give money to laborers instead of beloved sister, if there is no money, sell the governor's bungalow Bachchu Kadu criticized on shinde fadnavis government | 'लाडकी बहीण ऐवजी कष्ट करणाऱ्यांना पैसे द्या, पैसे नसतील तर राज्यपालांचा बंगला विका'; बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर

'लाडकी बहीण ऐवजी कष्ट करणाऱ्यांना पैसे द्या, पैसे नसतील तर राज्यपालांचा बंगला विका'; बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर

Bachchu Kadu ( Marathi News ) : राज्य सरकारने महिलांसाठी 'लाडकी बहीण योजना' सुरू केली आहे. या योजनेत महिलांना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहेत. या योजनेवरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दोन दिवसापूर्वी वित्त विभागातूनही या योजनेला विरोध असल्याची चर्चा सुरू आहेत. आता आमदार बच्चू कडू यांनीच राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे. " लाडकी बहीण ऐवजी कष्ट करणाऱ्यांना पैसे द्या, यासाठी पैसे नसतील तर राज्यपाल यांच्या बंगल्याची जागा विका',असा सल्लाही आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे. 

Anil Deshmukh News ...तर ठाकरे पिता पुत्र आज जेलमध्ये असते; अनिल देशमुखांचे देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप

"दुधाला भाव द्या, कामगाराला मजुरी द्या. चालकांसाठी चांगली योजना असली पाहिजे, यासाठी पैसे नसतील मी त्यांना चांगला पर्याय देतो. त्यांनी राज्यपाल यांचा ४० एकरातील बंगला विकावा. त्याचे एक लाख कोटी रुपयांपर्यंत पैसे येतील. ते पैसे तिकडे वापरा. राज्यपाल यांना ४० एकर जागा कशाला हवी? त्यांना नवीन तीन, चार मजली इमारत बांधून द्या, असा टोलाही बच्चू कडू यांनी लगावला. 

'योजना कष्टकऱ्यांसाठी पाहिजेत'

योजना आणायला काही हरकत नाही, पण त्या योजना कोणासाठी आणाव्यात हे महत्वाचं आहे. योजना कष्टकऱ्यांसाठी असायला पाहिजेत, असंही आमदार बच्चू कडू म्हणाले.

देशात श्रीमंतच अधिक श्रीमंत होत चालला आहे. मुंबईत पारसींकडे महत्वाची ६ हजार एकर जमीन आहे. इंग्रजांकडून त्यांनी बक्षिस म्हणून मिळवली. कष्ट करणाऱ्यांना वन बीएचके घर भेटणे खूप मोठं झालं आहे. कष्ट करणाऱ्यांचे मूल्य जपलं पाहिजे. सरकारला आम्ही शेतकऱ्यांचा वाटा बजेटमध्ये किती आहे हे विचारत आहे. त्यांचा या बजेटमध्ये वाटाच दिसत नाही, असा आरोपही बच्चू कडू यांनी केला. सध्या मोठी विषमता सुरू आहे. ही विषमता तोडली पाहिजे. यासाठी आम्ही ९ ऑगस्टला संभाजीनगरला मोठ्या मोर्चाचे आयोजन करत आहोत, असंही आमदार कडू म्हणाले.  

"आम्ही विधानसभेसाठी संघटन करत आहोत, आता आमचे दोन ते तीन सदस्य आहेत. आता आम्ही २० ते २५ जागांसाठी तयारी करत आहोत. आतापर्यंत आम्हाला अनेकांचे अर्ज आले आहेत, असंही बच्चू कडू म्हणाले. काँग्रेसनेही ज्या योजना आणल्या त्याच योजना आता महायुती सुद्धा आणत आहे. आम्ही आता त्यांना मागण्यांचे पत्र देणार आहे, त्यात आम्ही १६ मुद्दे देणार आहोेत. त्या योजना पूर्ण केल्या तर आम्ही निवडणुकाच लढणार नाही, महायुतीने मान्य केलं तर महायुतीला पाठिंबा देणार. महाविकास आघाडीने मान्य केलं तर त्यांना पाठिंबा देणार, असंही आमदार बच्चू कडू म्हणाले.

Web Title: 'Give money to laborers instead of beloved sister, if there is no money, sell the governor's bungalow Bachchu Kadu criticized on shinde fadnavis government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.