मागासवर्गीय आयोगाला एक लाखाहून अधिक निवेदने देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 12:14 PM2018-04-24T12:14:12+5:302018-04-24T12:14:12+5:30
सोलापूरात नियोजन बैठक, सकल मराठा समाजाचा निर्णय
सोलापूर : मराठा आरक्षणासंदर्भात जनसुनावणी करण्यासाठी येणाºया राज्य मागासवर्गीय आयोगाला समाजातील विविध घटकांकडून १ लाखाहून अधिक निवेदने देण्याचा निर्णय सकल मराठा समाजाच्या वतीने घेण्यात आला. शासकीय विश्रामगृहात झालेल्या या बैठकीला विविध राजकीय पक्षात, सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या नेत्यांची उपस्थिती होती.
राज्य मागासवर्गीय आयोगाच्या वतीने ४ मे रोजी शासकीय विश्रामगृहात मराठा आरक्षणासंदर्भात जाहीर सुनावणी आयोजित करण्यात आली आहे. आयोगाचे तज्ज्ञ सदस्य डॉ. सर्जेराव निमसे, डॉ. दत्तात्रय बाळसराफ, राजाभाऊ करपे आदी मान्यवर मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपण जाणून घेणार आहेत. हे सदस्य विभागवार जनसुनावणी घेऊन व्यक्ती, संघटना व सामाजिक संस्थेमार्फत माहिती संकलित करणार आहेत.
या पार्श्वभूमीवर सोमवारी शासकीय विश्रामगृहात सकल मराठा समाजाची बैठक घेण्यात आली. प्रास्ताविक माऊली पवार यांनी केले. आयोगाला अपेक्षित असलेली माहिती सांगण्याचा प्रयत्न केला. मराठा सेवा संघाचे माजी प्रदेशाध्यक्ष शिरीष जाधव यांनी निवेदनाचे स्वरूप आणि त्यासंदर्भातील इतर माहिती सांगितली.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शिवसेना नेते पुरुषोत्तम बरडे, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती विजयराज डोंगरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष संतोष पवार, युवा सेनेचे नेते गणेश वानकर, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, भाजपाचे माढा तालुकाध्यक्ष संजय कोकाटे, बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष दत्तामामा मुळे, विलास घुमरे, समाधान काळे, सतीश माने, संदीप मांडले, गणेश थिटे, दीपक गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, हिंदुराव देशमुख, प्रमोद डोके, सतीश काळे, संजय टोणपे, वैभव मोरे, गाढवे , संतोष पवार, नारायण जगदाळे, नवनाथ विधाते, दिलीप सुरवसे, महेश देशमुख, भैय्या देशमुख, मकरंद निंबाळकर, वेताळ भगत, शशिकांत चव्हाण, संजय जाधव, राज साळुंखे, प्रशांत पाटील, रमेश नवले, जीवन यादव, सोमनाथ राऊत, शिवाजी नीळ, राम जाधव, पूजा पाटील, राजेंद्र पाटील, श्रीकांत देशमुख, नानासाहेब काळे, राजन जाधव, अमोल शिंदे, श्रीकांत घाडगे, विनोद भोसले, संतोष भोसले, राजाभाऊ काकडे, प्रवीण डोंगरे, सुनील फुरडे, राजू सुपाते, शाम गांगुर्डे, प्रमोद भोसले, विलास लोकरे, श्रीकांत डांगे, प्रकाश डांगे, शेखर फंड, प्रकाश ननावरे, अमोल जाधव, अमोल जगदाळे, शामराव कदम, विजय पोखरकर, मोहन चोपडे, नलिनी जगताप, नंदाताई शिंदे, निर्मला शेळवणे, अभिंजली जाधव, लता ढेरे, दीपाली शिंदे, मनीषा नलवडे, प्रियंका डोंगरे, प्रल्हाद लोंढे, अभिराज शिंदे, विकी सूर्यवंशी, अक्षय जाधव, बाळासाहेब गायकवाड, लहू गायकवाड, राज पांढरे, सुशील कन्नुरे, हरी सावंत, योगेश क्षीरसागर, महेश सावंत, प्रा. गणेश देशमुख आदी उपस्थित होते
निवेदन केंद्र उभारणार
- समाजाच्या सर्व घटकांतील व्यक्तीला आपली व्यथा मांडता यावी, यासाठी तालुका, गाव आणि वाड्यावस्त्यांवर निवेदन केंद्र उभारण्यात येणार आहे. बचत गट, ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपालिका व नगरपरिषद, शैक्षणिक संस्था, समाजातील सामाजिक संस्था, मराठा मोर्चाला ज्या ज्या समाजाने लेखी पाठिंबा दिला त्या समाजाचे ठराव संकलित करण्याचा निर्णय या बैठकीत झाला.