गुरव समाजाच्या वसतिगृहासाठी जागा द्या, बांधकाम करुन देऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:25 AM2021-09-22T04:25:23+5:302021-09-22T04:25:23+5:30

अक्कलकोट येथील लोखंडे मंगल कार्यालयात आयोजित गुरव समाजातील दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव समारंभात ते बोलत होते. यावेळी ...

Give space for Guru's hostel, let's build it | गुरव समाजाच्या वसतिगृहासाठी जागा द्या, बांधकाम करुन देऊ

गुरव समाजाच्या वसतिगृहासाठी जागा द्या, बांधकाम करुन देऊ

Next

अक्कलकोट येथील लोखंडे मंगल कार्यालयात आयोजित गुरव समाजातील दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव समारंभात ते बोलत होते. यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, ह. भ. प. काशिनाथ गुरव महाराज, संघटनेचे तालुकाध्यक्ष शिवानंद फुलारी, उद्योगपती संजय पाटील, उपाध्यक्ष रमेश फुलारी उपस्थित होते.

आमदार म्हणाले, गुरव समाजाने आजवर करीत असलेले सामाजिक कार्य उल्लेखनीय आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहोत, असेही ते म्हणाले. यावेळी कस्तुरी गुरव यांनी योगाचे धडे दिले. शरणप्पा फुलारी यांनी प्रास्ताविक केले. स्वामिनी पाटील, समृद्धी फुलारी या विद्यार्थ्यांनी प्रारंभी स्वागत गीत सादर केले. विद्याधर गुरव यांनी सूत्रसंचालन केले. करुणा गुरव यांनी आभार मानले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजेंद्र सुरवसे, मल्लिनाथ पुजारी, बसवराज फुलारी, स्वामीनाथ गुरव, डॉ. शिवपुत्र गुरव, काशिनाथ बहादुरे, ज्ञानेश्वर गुरव, समन्वय समितीचे काशिनाथ फुलारी, लक्ष्मीपुत्र पाटील, मुत्तण्णा गुरव, प्रदीप गुरव, अशोक अवटे, विजय गुरव, शिवानंद पुजारी, स्वामीराव गुरव, कृष्णा फुलारी, सावित्री गुरव, प्रशांत फुलारी आदींनी परिश्रम घेतले.

फोटो ओळ:- अक्कलकोट येथील गुरव समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करताना आमदार सचिन कल्याणशेट्टी, हभप काशिनाथ गुरव महाराज, संजय पाटील, रमेश फुलारी आदी.

...........

(फोटो २१अक्कलकोट गुरव समाज)

Web Title: Give space for Guru's hostel, let's build it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.