पोलिसांचे कुटुंबिय म्हणतायत आम्हाला मुलभूत सुविधा द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:49 AM2021-02-05T06:49:01+5:302021-02-05T06:49:01+5:30
शहरात रात्रंदिवस नागरिकांच्या सुरक्षेसाठी कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांच्या पोलीस वसाहतीत नागरी समस्याचा विळखा पडला आहे. पोलीस वसाहतील नागरिकांना रस्ते दुरुस्ती, ...
शहरात रात्रंदिवस नागरिकांच्या सुरक्षेसाठी कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांच्या पोलीस वसाहतीत नागरी समस्याचा विळखा पडला आहे. पोलीस वसाहतील नागरिकांना रस्ते दुरुस्ती, नालेसफाई, पिण्याचे पाणी लाईन, इमारतीची दुरुस्ती याकडे वारंवार विनंती पत्र, तक्रार करुन दुर्लक्ष करीत आहेत.
नागरी सुविधा देण्याची जबाबदारी असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि राज्यशासन प्रशासन आपली जबाबदारी एक दुसऱ्यावर ढकलत आहेत. प्रशासन मात्र कागदावर दर वर्षी दुस्तीच्या नावाखाली पोलीस वसाहतीत लाखों रुपये खर्ची केल्याचे कागदपत्र तयार होतात. समस्या मात्र अनेक वर्षापासून जैसे थे च आहेत.
यामुळे मानवी हक्क संरक्षण जागृती संस्थेचे महाराष्ट्र सचिव मनीष देशपांडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग पंढरपूर व नगरपरिषद पंढरपूर त्यांच्याविरोधात सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले आहे.
यावेळी सुनीता वाघमारे, इब्राहिम शेख, रंजना शेडगे, गौरी कांबळे, निलोफर शेख, अलका जाधव, संगीता जाधव उपस्थित होत्या.
या आहेत मागण्या
पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन दुरुस्त तसेच नवीन टाकून देणे. भुयारी गटार नवीन तयार करुन देणे. वसाहती अंतर्गत रस्ते तयार करुन देणे. संरक्षण भिंत बांधून तसेच गेट व पोलीस वसाहतीच्या नावाचे फलक तयार करुन देणे. अपूर्ण ठेवलेली कामे पूर्ण करणे. घराच्या पुढील मागील बाजूचे नवीन दरवाजे बसवणे. खिडक्यांची दुरुस्ती करणे. रोड लाईट बंद दुरुस्त करुन देणे. पोलीस वसाहतमध्ये अपघात झालेल्या आणि गुन्हा दाखल झालेल्या सर्व गाड्या काढणे. पोलीस वसाहतमधील रिकाम्या जागेमध्ये लहान मुलांसाठी बाल उद्यान आणि मैदान तयार करुन देणे.
फोटो ::::::::::::::::::::
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करताना पोलिसांचे कुटुंब. (सचिन कांबळे)