वस्तू घेण्यासाठी वेळ दिल्यामुळे ग्राहकांची आता शिस्तीत खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 03:37 PM2020-05-13T15:37:41+5:302020-05-13T15:39:26+5:30

बाजारपेठेतील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर; फिजिकल डिस्टन्सचे पालन करण्याकडेही लक्ष

Given the time to pick up items, customers now shop in a disciplined manner | वस्तू घेण्यासाठी वेळ दिल्यामुळे ग्राहकांची आता शिस्तीत खरेदी

वस्तू घेण्यासाठी वेळ दिल्यामुळे ग्राहकांची आता शिस्तीत खरेदी

Next
ठळक मुद्देजीवनावश्यक वस्तूंच्या मालवाहतुकीत तसेच व्यापाºयांच्या खरेदीत केंद्र सरकारने सुरुवातीपासून विशेष सवलत दिली बहुतांश व्यापाºयांकडे तसेच किराणा दुकानांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा मुबलक पुरवठातांदूळ, गहू, ज्वारी, तेल, साखर, डाळ तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत सुरू

सोलापूर : लॉकडाऊनच्या या काळात जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी सुरुवातीपासून किराणा दुकानांसमोर लोकांची मोठी गर्दी पाहायला मिळत होती. खरेदीकरिता लोकांची गर्दी संपता संपेना, अशी स्थिती होती. पण आता ही गर्दी काही प्रमाणात ओसरली आहे. नागरिक शांत आणि संयमाने जीवनावश्यक वस्तू खरेदी करताना दिसत आहेत. दुसरीकडे फिजिकल डिस्टन्सचे पालन करण्याची सवय नागरिकांना लागत असून, अशाच प्रकारची शिस्त पाळली गेली तर कोरोनासारख्या जीवघेण्या आजारावर आपल्याला निश्चतच मात करता येईल, असे किराणा दुकानदारांकडून सांगण्यात येत आहे. 

जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी जिल्हा प्रशासनाने सकाळची एक नियमित वेळ ठरवून दिली आहे. त्यामुळे नागरिक सकाळी अकराच्या आत जीवनावश्यक वस्तू खरेदी करताहेत. 

लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होतो की काय, अशी एक अनामिक भीती नागरिकांमध्ये होती. याच भीतीने किराणा दुकानदारांकडून तसेच व्यापाºयांकडून वस्तूंचे भाव अमाप वाढवले गेले. याचाही फटका नागरिकांना बसत होता.

बेकरी पदार्थही मिळताहेत

  • - तांदूळ, गहू, ज्वारी, तेल, साखर, डाळ तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत सुरू आहे. यासोबत इतर खाद्यपदार्थ टोस्ट, समोसे, खारी, बिस्किट्स तसेच बेकरी पदार्थ मिळत आहे. दूध डेअºया सकाळी उघड्या असतात. दुग्धजन्य पदार्थांचीही कमतरता नाही. 
  • - जीवनावश्यक वस्तू विकणाºया दुकानासमोर तसेच दूध डेअरीमध्ये आता फिजिकल डिस्टन्स पालन होतेय, असे अक्कलकोट रोड येथील दूध डेअरी मालक श्यामसुंदर गर्जे यांनी सांगितले आहे.
  • वस्तूंचा मुबलक पुरवठा
  • - जीवनावश्यक वस्तूंच्या मालवाहतुकीत तसेच व्यापाºयांच्या खरेदीत केंद्र सरकारने सुरुवातीपासून विशेष सवलत दिली आहे. त्यामुळे बहुतांश व्यापाºयांकडे तसेच किराणा दुकानांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा मुबलक पुरवठा होता. कुंभार वेस येथील व्यापारी दिग्विजय बिराजदार यांनी दिलेल्या माहितीनुसार आजही बाजारात मुबलक जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा आहे. खरेदीसाठी लोक मोठ्या संख्येने बाहेर पडत आहेत. त्यामुळे वस्तूंची नियमित उपलब्धता कमी आहे. त्यामुळे आम्ही शेतकºयांकडून किंवा मोठ्या व्यापाºयांकडून पुण्याहून मागवतोय.

आता पोलिसांची भीती नाही
- सकाळी आम्ही जीवनावश्यक वस्तूंसाठी दर दोन-तीन दिवसाआड बाहेर पडतोय. किराणा दुकानातून आम्हाला सर्व वस्तू मिळत आहेत. फक्त वाढीव दराने मिळत आहेत. दर स्थिर असणे आवश्यक आहे. काही ठिकाणी फिजिकल डिस्टन्सचे पालन होते तर काही ठिकाणी नाही. पूर्वी खरेदीसाठी बाहेर पडलो की पोलिसांची भीती असायची, आता ती भीती नाही. नियोजित वेळेतच आम्ही खरेदी करतोय. इतर नागरिक याचे पालन करताना दिसत आहेत, असे अशोक चौक येथील संजू बसुदे यांनी सांगितले.

Web Title: Given the time to pick up items, customers now shop in a disciplined manner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.