दोन एकर जमीन देतो, पण कोविड सेंटर तयार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:22 AM2021-04-24T04:22:34+5:302021-04-24T04:22:34+5:30

: दोन एकर जमीन देतो, पण कोविड सेंटर तयार करावेत, अशी मागणी अतुल खुपसे-पाटील यांनी निवेदनाद्वारे अतुल खुपसे-पाटील यांनी ...

Gives two acres of land, but build a covid center | दोन एकर जमीन देतो, पण कोविड सेंटर तयार करा

दोन एकर जमीन देतो, पण कोविड सेंटर तयार करा

Next

: दोन एकर जमीन देतो, पण कोविड सेंटर तयार करावेत, अशी मागणी अतुल खुपसे-पाटील यांनी निवेदनाद्वारे अतुल खुपसे-पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.

माढा व करमाळा तालुक्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. मात्र दोन्ही तालुक्यात सुस्थितीत कोविड सेंटर नसल्याने रुग्णांना अकलूज, बार्शी किंवा सोलापूर येथील रुग्णालयात जावे लगत आहे. त्याठिकाणी गेल्यावर बेड मिळत नाहीत. त्यातच त्यांना जीव गमवावा लागतो, ही भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे उपळवाटे येथील दोन एकर शेत जमीन विना मोबदला सरकारने घेऊन त्याठिकाणी एक मोठे कोविड सेंटर उभा करावेत. या दोन तालुक्यातील नागरिकांचे जीव वाचवावेत, अशी मागणी त्यांनी केली.

सध्या बेड व योग्य ते औषध उपचार मिळत नसल्याने अनेक रुग्ण दगावत आहेत. त्याचा फटका त्यांच्या कुटुंबात बसत आहे. त्यामुळे उपळवाटे येथील दोन एकर जमीन रुग्णांच्या सेवेसाठी व कोविड सेंटर तयार करण्यासाठी विनामोबदला देण्यास तयार आहे. त्या ठिकाणी सेंटर उभारून रुग्णांना दिलासा द्यावा, अशी विनंती त्यांनी निवेदनात केली आहे.

Web Title: Gives two acres of land, but build a covid center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.