Doctors' Day; दररोजच्या पहिल्या तीन रुग्णांना रोपांची भेट, शुल्कही माफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 12:26 PM2019-07-01T12:26:53+5:302019-07-01T12:29:55+5:30

सोलापुरातीतल आनंद मुदकण्णा यांचा उपक्रम; वृक्षसंवर्धन चळवळीला बळकटी देण्याचा प्रयत्न

Giving the seedlings to the first three patients every day, the excise duty | Doctors' Day; दररोजच्या पहिल्या तीन रुग्णांना रोपांची भेट, शुल्कही माफ

Doctors' Day; दररोजच्या पहिल्या तीन रुग्णांना रोपांची भेट, शुल्कही माफ

googlenewsNext
ठळक मुद्दे शहरातील एक पर्यावरणप्रेमी डॉक्टर म्हणून डॉ. आनंद मुदकण्णा प्रसिद्ध आहेतसोलापुरातील आगळ्या-वेगळ्या ‘झाडांची भिशी’ या उपक्रमाचे ते सदस्य ‘झाडे लावा आणि झाडे जगवा’ या चळवळीला बळकटी देण्यासाठी येथील प्रसिद्ध मेंदूरोग तज्ज्ञ डॉ. आनंद मुदकण्णा

सोलापूर : ‘झाडे लावा आणि झाडे जगवा’ या चळवळीला बळकटी देण्यासाठी येथील प्रसिद्ध मेंदूरोग तज्ज्ञ डॉ. आनंद मुदकण्णा यांनी दररोज येणाºया पहिल्या तीन रुग्णांची मोफत तपासणी करण्यासोबतच त्यांना रोपे भेट देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. झाडांचे संगोपन करणाºया रुग्णांची तपासणी फी माफ करण्यात येणार आहे. 

 शहरातील एक पर्यावरणप्रेमी डॉक्टर म्हणून डॉ. आनंद मुदकण्णा प्रसिद्ध आहेत. सोलापुरातील आगळ्या-वेगळ्या ‘झाडांची भिशी’ या उपक्रमाचे ते सदस्य आहेत. आपल्या नव्या उपक्रमाबद्दल ‘लोकमत’शी बोलताना डॉ. मुदकण्णा म्हणाले, माझे शालेय शिक्षण अकलूजच्या ग्रीन फिंगर्स स्कूलमध्ये झाले. ग्रीन फिंगर्स म्हणजे झाडं जगविण्याची क्षमता असलेली माणसं. शिक्षणाच्या काळात मी शाळेच्या आवारात विविध प्रकारची झाडं वाढविलेली पाहिली. शाळेने एक आदर्श दिला. 

पुढे डॉक्टर झाल्यानंतर रुग्णांची सेवा करताना आपली आवडही जोपासण्याचा प्रयत्न मी सुरू ठेवला. व्यवसायात अडकलेल्या प्रत्येक माणसाला नियमितपणे बाहेर जाऊन झाडे लावणं जमत नाही. माझीही तीच अडचण आहे, पण यातून मार्ग काढण्यासाठी मी आता माझ्याकडे दररोज येणाºया पहिल्या तीन रुग्णांना रोपे भेट देण्याचा विचार मांडला. माझ्या सहकाºयांनाही तो आवडला. पावसाला सुरुवात झाल्यानंतर दररोज येणाºया पहिल्या तीन रुग्णांकडून तपासणी फी घेत नाही. तपासणी झाल्यानंतर या तिघांना एक-एक रोप भेट देतो. या रुग्णांनी या रोपांचे संगोपन करावे. पुढील तपासणीला येताना त्या रुग्णाने ते झाड जिवंत आहे की नाही. त्याचे कशा पद्धतीने संगोपन सुरू आहे, याचा फोटो घेऊन यावा. मोबाईलवर काढलेला फोटो असेल तरी चालेल. या रोपांचे संगोपन करून त्याचे झाड झाल्यास त्या रुग्णांकडून पुन्हा तपासणी फी घेण्यात येणार नाही. एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर रुग्णांनी झाडाचे फोटो आणण्याची गरज नाही. 

कडूलिंबाच्या रोपांना प्राधान्य 
- डॉ. मुदकण्णा म्हणाले, पर्यावरण बिघडत आहे. भूजल पातळी घटत चालली आहे. आपली सामाजिक बांधिलकी समजून मी या कामाला सुरुवात केली. माझ्याकडे येणाºया रुग्णांना मी कडूलिंबाची झाडे देण्याचा प्रयत्न करतोय. कडूलिंब हे निसर्गासाठी सर्वाधिक उपयुक्त झाड असल्याचे सिद्ध झाले आहे. औषधी म्हणून त्याचा उपयोग आहे. कार्बनडाय आॅक्साईडही ते कमी प्रमाणात सोडते. कडूलिंब कोणत्याही वातावरणात वाढू शकते. त्याला पाण्याची फारशी गरज नसते.

रुग्णांकडूनही प्रतिसाद
- रुग्णांकडून या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळतोय. अनेक लोक दूरवरून येतात. जाताना हे रोप व्यवस्थित घेऊन जाऊ. पुन्हा येताना त्याचा फोटो घेऊन येऊ, असे सांगत आहेत. सोलापूरचे तापमान वर्षागणिक वाढत चालले आहे. प्रदूषणामुळे वाढत चालल्याने येथील हवा आरोग्यदायी नाही, हे स्पष्ट होत आहे. मागील काळात दुष्काळ पडला होता तेव्हा चार महिने हा उपक्रम राबविला होता. अवंती नगर येथील नव्या हॉस्पिटलच्या परिसरात झाडे लावण्यात आली आहेत, असेही डॉ. मुदकण्णा यांनी सांगितले.

Web Title: Giving the seedlings to the first three patients every day, the excise duty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.