ऊसशेतीला फाटा देत तीन एकरावरील द्राक्ष उत्पादनात मिळविले १६ लाखांचे उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 10:37 AM2020-02-25T10:37:26+5:302020-02-25T10:40:00+5:30
करकंब येथील शरद पांढरे या शेतकºयाची यशोगाथा; पाच टन केला बेदाणा
शहाजी काळे
करकंब : पारंपरिक ऊसशेतीला फाटा देऊन तीन एकर द्राक्ष शेतीतून तब्बल १६ लाखांचे उत्पादन घेण्याची किमया करकंब (ता़ पंढरपूर) येथील एका शेतकºयाने साधली आहे़ नवनवीन प्रयोग, वेगवेगळ्या फवारण्या आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याने १९ टन द्राक्षे तर ५ टन बेदाणा केला.
अॅड. शरद पांढरे असे त्या शेतकºयाचे नाव आहे़ पांढरे यांनी वकिलीचे शिक्षण पूर्ण केले आहे. वकिली व्यवसायाला बगल देत शेतीकडे लक्ष केंद्रित केले. त्यांची शेती उजनी डाव्या कालव्यालगत आहे़ सुरुवातीपासूनच त्यांचा उसाकडे कल होता़ त्यांना प्रयोगशील शेतीची आवड असल्याने विविध ठिकाणी भेटी देऊन वेगवेगळ्या पिकांचा अभ्यास केला़ नानासाहेब पर्पल या वाणाच्या द्राक्षाची तीन एकर क्षेत्रात लागवड केली. नानासाहेब हे वाण जोखमीचे असून, या जातीला जास्तीच्या कीटकनाशक फवारणी व जास्तीचा उत्पादन खर्च करावा लागतो. परंतु उच्चशिक्षित व व्यवसायाने वकील असलेल्या पांढरे यांना शेतीमध्ये नवनवीन पिकांचा अभ्यास करून प्रयोगशील शेती करण्याचा छंद जडलेला.
त्यांनी नानासाहेब वाणाची जोखीम स्वीकारली. आॅक्टोबर महिन्यात द्राक्षाची पीक छाटणी केली. त्यानंतर सलग ५५ दिवस कमी-अधिक प्रमाणाचा पाऊस लागल्यामुळे नानासाहेब वाणाची जोखीम वाढली़ बागेवर दावण्या व इतर रोगांचा प्रादुर्भाव होऊ लागला़ त्यामुळे त्यांना अतिरिक्त एक लाख रुपयांच्या कीटकनाशकाची फवारणी करावी लागली. त्यांना द्राक्षातून किमान ४० टन उत्पादन अपेक्षित होते. परंतु छाटणीनंतर सुरुवातीच्या काळात असलेल्या खराब हवामानामुळे द्राक्षाचा दर्जा घसरला तरी पांढरे यांची असलेली महत्त्वाकांक्षा, जिद्द आणि चिकाटी यामुळे २४ टन उत्पादन घेण्यात यश मिळाले़ त्यापैकी त्यांनी १९ टनाचे मार्केटिंग केले़ उर्वरित ५ टन बेदाणा केला. तीन एकरांत उत्पादन घेण्यासाठी त्यांना पाच लाखांचा खर्च आला़ एकूण उत्पादनातून ५ लाख उत्पादन खर्च वजा जाता ११ लाख ५० हजार रुपये निव्वळ उत्पन्न मिळाले आहे.
सततच्या पावसाने १२ लाखांचे नुकसान
- पांढरे यांनी द्राक्ष पिकासाठी आॅक्टोबर महिन्यात छाटणी केली. परंतु आॅक्टोबर महिन्यात ५५ दिवस सतत पाऊस असल्यामुळे बागेवर दावण्यासह इतर रोगांचा प्रादुर्भाव झाला आणि संकट ओढावले. यावर मात करण्यासाठी पांढरे यांनी महागडी कीटकनाशक औषधे फवारणी करुन बाग जोपसण्याचा प्रयत्न केला. परंतु रोगाच्या प्रादुर्भावामुळे द्राक्षाची गुणवत्ता ढासळली शिवाय उत्पादनातही घट झाली़ तीन एकरांतून किमान ४० टन द्राक्ष अपेक्षित होते. परंतु त्यामध्ये घट झाली आणि २४ टनावर समाधान मानावे लागले़
नानासाहेब हे वाण जोखमीचे असताना लागवडीपूर्वीच त्याचा अभ्यास केला होता. अनेक ठिकाणच्या अभ्यासदौºयात त्याचे फायदे-तोटे आणि लागवडीचे तंत्र अवगत केले होते. परिणामत: तीन एकरात्ां १६ लाखांचे द्राक्ष आणि बेदाणा घेता आला आणि याचे मार्केटिंगदेखील स्वत:च केले़यातून काही चांगले शिकताही आले़
- अॅड. शरद पांढरे, द्राक्ष उत्पादक