गो कोरोना... गो कोरोना... म्हणत लसीकरणास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:19 AM2021-01-17T04:19:58+5:302021-01-17T04:19:58+5:30

उपजिल्हा रुग्णालय येथील संसर्गजन्य रुग्णालय येथे कोविड १९ लसीकरण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. ...

Go Corona ... Go Corona ... saying start vaccination | गो कोरोना... गो कोरोना... म्हणत लसीकरणास सुरुवात

गो कोरोना... गो कोरोना... म्हणत लसीकरणास सुरुवात

Next

उपजिल्हा रुग्णालय येथील संसर्गजन्य रुग्णालय येथे कोविड १९ लसीकरण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, प्रांताधिकारी सचिन ढोले, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, उपजिल्हा अधीक्षक डॉ. अरविंद गिराम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, डॉ. प्रदीप केचे, डॉ. संभाजी भोसले, डॉ. प्रसन्न भातलवंडे, डॉ. आबासाहेब गायकवाड, डॉ. दीपक धोत्रे, डॉ. अनंत पुरी, परिचारिका प्रमुख रेखा ओंबासे, रेवती नाडगौडा, मंगल करचे, सचिन कदम, सुधीर भातलवंडे, माजी आरोग्य सभापती विवेक परदेशी, नगरसेवक विक्रम शिरसट, कल्पना बिडकर, रजिया नदाफ, नितीन घाडगे उपस्थित होते.

२८ दिवसांनी देणार दुसरी लस

पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अरविंद गिराम यांना कोविडची लस देण्यात आली. लसीकरण केंद्रात गर्दी होऊ नये. यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पहिली लस घेतल्यानंतर २८ दिवसांनी दुसरी लस दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले. लसीकरण केंद्रासमोर नगर परिषदेचे माजी आरोग्य सभापती विवेक परदेशी यांनी गो कोरोना....गो कोरोना अशा घोषणा दिल्या.

-----

Web Title: Go Corona ... Go Corona ... saying start vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.