गोवा बनावटीचा विनापरवाना १२ लाखांचा मद्यसाठा सोलापूरात जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 04:12 PM2018-07-07T16:12:33+5:302018-07-07T16:15:41+5:30
उत्पादन शुल्क विभागाची कारवाई : ११ लाख ९४ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
सोलापूर : उत्पादन खात्याने मंगळवेढा-सोलापूर मार्गावर सिद्धनाथ सह. साखर कारखान्यासमोर तिºहे (ता. उ. सोलापूर) येथे गोवा बनावटीच्या विनापरवाना मद्यसाठ्यावर छापा टाकला. या कारवाईत एक वाहन आणि गोवा बनावटीचे मद्य असा एकूण ११ लाख ९४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुय्यम निरीक्षक उत्पादन शुल्क अ-२ विभागाला मंगळवेढा-सोलापूर रस्त्यावर तिºहे येथे गोवा बनावटीच्या मद्याची विनापरवाना बेकायदेशीर वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी सापळा रचून या ठिकाणी एक वाहन पकडले. यामध्ये मोठ्या प्रमाणावर गोवा बनावटीचे मद्य आढळून आले. सोलापूर जिल्हा आणि कर्नाटकामध्ये हे मद्य बेकायदेशीर विक्रीस जाणार होते. या कारवाईत रेनॉ कंपनीची डस्टर कार (क्र. एम.एच. १०/सीएच - ९५५५) या वाहनात विदेशी दारू मॅक्डॉल नं. १ चे ५ बॉक्स, रमचे ६ बॉक्स, डीएसपी ब्लॅक ४ बॉक्स, बॅगपायपर ४ बॉक्स, आयबी १ बॉक्स, गोल्डन एएसई ५ बॉक्स यासह एकूण ११ लाख ९४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी अशोक बबन निळे (वय २६, रा. व्हस्पेट, ता. जत, जि. सांगली), राजू दºयाप्पा डिस्कळ (वय २६, रा. कोळगिरी, ता. जत, जि. सांगली) या दोन आरोपींना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई उत्पादन शुल्क संचालक सुनील चव्हाण, अधीक्षक रवींद्र आवळे, उपअधीक्षक बी. एम. बिराजदार, निरीक्षक भिसे, अनिल पाटील, दुय्यम निरीक्षक किरण बिराजदार, ए. बी. शितोळे, ए. ए. सुतार, कॉन्स्टेबल व्ही. एन. शेळके, सिद्धार्थ कांबळे, संजय नवले यांच्या पथकाने केली.