शेळीने एकाच वेळी तब्बल सात पिलांना दिला जन्म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 01:55 PM2019-06-13T13:55:02+5:302019-06-13T15:53:55+5:30
पंढरपूर तालुक्यातील सुस्ते येथील घटना : शेतकºयांनी शेळीला पाहण्यासाठी केली गर्दी
पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील सुस्ते येथील संतोष नागटिळक या शेतकºयाच्या शेळीने तब्बल सात पिलांना जन्म दिला आहे.
सुस्ते येथील संतोष नागटिळक या शेतकºयाच्या सहाव्या येताच्या शेळीने एक नाही, दोन नाही तर तब्बल सात पिलांना जन्म दिला आहे. ही शेळी गेल्या तीन वर्षांपूर्वी संतोष नागटिळक यांनी लहान पिलू असताना बाजारातून विकत घेऊन त्यांची सासरवाडी मुडलिंब (ता. मोहोळ) येथे अर्ध्या हिस्स्याने दिली होती. शेळीला पहिल्यांदा तीन, दुसºया, तिसºया, चौथ्या आणि पाच वेळेस पाच पिलांना जन्म दिला होता़ मुडलिंब येथे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेळीला नागटिळक यांनी सुस्ते येथे घेऊन आले. त्यावेळेस ती शेळीे सहाव्या येताची होती. यावेळेस शेळीने तब्बल सात पिलांना जन्म दिला आहे.
ही शेळी देशी गावरान जातीची आहे. विशेष म्हणजे ही शेळी वर्षातून दोन वेळेस पिलांना जन्म देते. संतोष नागटिळक यांच्या शेळीने एका वेळेस सात पिलांना जन्म दिल्याने सुस्ते परिसरातील शेतकºयांनी शेळी व पिलांना पाहण्यासाठी गर्दी केली.