सोन्यांच्या दरात घसरण; सोलापुरातील गुंतवणूकदार घेताहेत सोन्याची बिस्किटं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 12:25 PM2019-11-22T12:25:56+5:302019-11-22T12:30:34+5:30
दरांच्या अस्थिरतेत दररोज ५ किलो सोने अन् १५ किलो चांदीची सोलापुरात विक्री
यशवंत सादूल
सोलापूर : मागील दीड महिन्यापासून सोन्याच्या दरात चढ-उतार होत असताना सराफ बाजार मात्र ग्राहकांनी फुलून गेला आहे. लग्ससराईमुळेही सोन्याच्या दागिन्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी सुरू आहे. शिवाय दराच्या अस्थिरतेचा लाभ गुंतवणूकदारही घेत आहेत. गेल्या महिन्याभरात सोलापुरात दररोज ५ किलो सोन्याची दागिने आणि बिस्कीट स्वरूपात विक्री होत आहे; तर १५ किलो चांदीचीही खरेदी केली जात असल्याचे जाणत्या सराफ व्यावसायिकांनी सांगितले. दरम्यान, आज सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ३८,३०० रूपये; तर चांदीचा दर ४५,३०० रूपये किलो होता.
आंतरराष्ट्रीय ट्रेडवॉरचा परिणाम जागतिक बाजारपेठेवर होऊन अलीकडच्या काळात सातत्याने सोन्याच्या दरात चढ-उतार होत आहे. अमेरिका चीनच्या वस्तूंवर बंदी घालण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचा परिणाम डॉलर आणि रुपयाच्या विनिमयदरावर होऊन डॉलरची किंमत कमी-जास्त होते़ परिणामी रुपयाच्या मूल्यातही बदल आहे. डॉलरच्या मूल्यानुसार दररोजचा सोन्याचा भाव ठरत असल्याने त्याप्रमाणे भारतीय बाजारपेठेत सोन्याच्या दरात चढ-उतार होतो. सध्या लग्नसराई सुरू असून मंगल कार्यासाठी आवश्यक असलेल्या सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करणे सर्वांना अपरिहार्य असते़ मंगळसूत्र, नेकलेस, पाटल्या, नाणीहार, लॉकेट, अंगठी या लग्नविधीसाठी आवश्यक सोन्याच्या दागिन्यांसोबत चैनीच्या दागिन्यांची खरेदीसाठी ग्राहकांचे समूह सराफ बाजारात सर्वत्र दिसून येत होते़
लाईट वेट, आॅफिस वेअर मंगळसूत्राची के्रे झ
- कॉर्पोरेट क्षेत्रात व आॅफिसमध्ये नोकरी करणाºया युवती व महिला कमी वजनाच्या, फॅन्सी नाजूक मंगळसूत्र जास्त पसंद करतात. आठ ग्रॅम ते पंधरा ग्रॅममध्ये हे उपलब्ध असून त्यामध्ये आकर्षक खडे बसविलेले असतात. पारंपरिक मंगळसूत्रांच्या किंमतीत असे चार ते पाच फॅन्सी, फंक्शनल, पार्टीवेअर अशा वेगवेगळ्या डिझाईनचे मंगळसूत्र घेण्याकडे कल वाढत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा स्थानिक पातळीवरील किमतीवर कोणताच परिणाम होत नाही़ लग्नसराई असल्याने दरवाढीचा विचार न करता ग्राहक खरेदी करतात. चैनीच्या आणि दूरगामी गुंतवणूक करण्याच्या उद्देशाने खरेदी करण्यात येणारी बिस्किटे, चेन, वेढणी, वेगवेगळ्या प्रकारच्या स्त्रियांच्या अंगठ्या यांचीही बाजारात चांगली विक्री होत आहे.
- गिरीश देवरमनी,
अध्यक्ष, सोलापूर सराफ असोसिएशऩ
सोलापूरच्या सराफ पेढीला तीनशे वर्षांचा वारसा असून लगतच्या मराठवाडा, कर्नाटक मधील पाच-सहा जिल्ह्यातील ग्राहकांचा सोलापूरच्या सराफ बाजाराने विश्वास संपादन केला आहे.पण ब्रँडिंग केल्यास आणखी बाजारपेठ वाढविण्याची संधी आहे़
- मिलिंद वेणेगूरकर,
सराफ व्यावसायिक, आपटे ज्वेलर्स, सोलापूर
- मराठी व हिंदी टीव्ही सिरिअलमधील अभिनेत्रींनी परिधान केलेल्या दागिन्यांची युवतींसह व महिला वर्गाकडून विशेष मागणी आहे़ यामध्ये छत्रपती संभाजी या ऐतिहासिक मालिकेसह माझ्या नवºयाची बायको, तुझ्यात जीव रंगला यासारख्या मालिकांचा समावेश आहे़ हे टेम्पल ज्वेलर्स प्रकारात मोडतात या दागिन्यांना गेरुचे पॉलिश असते.