'चिल्लाएगी तो मार डालुंगा', असे म्हणून घरातील सोने पळविले; गादेगाव येथे दोन चोरांनी घातला दरोडा
By Appasaheb.patil | Published: September 25, 2023 10:00 AM2023-09-25T10:00:07+5:302023-09-25T10:01:20+5:30
सोने, चांदी, रोख रक्कम, मोबाईल पळविला
पंढरपूर : नरड्याला चाकु लावून चुपचाप सो जा, हम दो लोगो का खून करके आये है, चिल्लाएगी तो मार डालुंगा, तुम्हारे पास क्या है वो दे दो, और चादर ओढ के सो जा, अशी धमकी गादेगाव (ता. पंढरपूर) येथील घरात एकटी असलेल्या महिलेला देऊन दोन चोरांनी ३४ ग्रॅम सोने, अंदाजे अडीज भार चांदीचे दागिणे, ४ हजार रुपये किंमतीचा मोबाईल, ४० हजार रुपयांची रोख रक्कम पळवून नेहल्याची घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उषा सोमनाथ बागल (वय २९, रा. गादेगाव, ता. पंढरपूर) यांच्या घरातील सर्वजण बाहेर गेल्याने २३ सप्टेंबर (शनिवारी) त्या घरात एकट्याच होत्या. एकटीच असल्याने दरवाजा उघडा ठेऊन झोपी गेल्या होत्या. रविवारी रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास अचानक त्यांना कपाट उघडल्याचा आवाज आला. त्यामुळे त्या जागी झाल्या. तेव्हा त्यांनी घरातील लाईटच्या प्रकाशात पाहिले असता त्यांना समोर दोन इसम उभे दिसले.
उषा यांनी आरओरडा केल्यानंतर त्या इसमाने उषा यांच्या नरड्याजवळ चाकु धरुन चुपचाप सो जा, हम दो लोगो का खून करके आये, है, चिल्लाएगी तो मार डालुंगा, चादर ओढ के सो जा, असे म्हणून धमकी दिल्याने उषाा झोपी गेल्या. त्यांनी कपाटातील दागिणे व रोख रक्कम काढल्यानंतर उषा जवळ आले. तुम्हारे पास क्या है वो दे दो असे म्हणताच भितीपोटी उषा यांनी कानातील रिंगा व गळ्यातील मंगळसुत्र त्यांना देऊन टाकले. यानंतर ते गेले. या चोरी दरम्यान उषा यांच्या घरातील मिनिगंठण, अंगठी, कानातील रिंगा, मंगळसुत्र असे ३४ ग्रॅम सोने, अंदाजे अडीज भार चांदीचे दागिणे, ४ हजार रुपये किंमतीचा मोबाईल, ४० हजार रुपयांची रोख रक्कम चोरांनी पळवून नेहली आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांनी भेट दिली आहे.