सोलापूरकरांच्या प्रेमामुळे हत्तीचे बळ मिळाले आयुक्त गुडेवार: पाणीप्रश्न वर्षभरात मिटेल
By admin | Published: May 8, 2014 07:45 PM2014-05-08T19:45:27+5:302014-05-09T00:13:28+5:30
सोलापूर:सोलापूरकरांचे प्रेम पाहून मी भारावून गेलो, कित्येक हत्तींचे बळ या प्रेमामुळे मला मिळाले असून, यापुढे देखील अधिक जोमाने काम करु, असे आश्वासन मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी स्वागतासाठी उपस्थित असलेल्या नागरिकांसमोर दिले़ वर्षभरात पाणीप्रश्न मिटेल, असेही ते म्हणाले़
सोलापूर:
सोलापूरकरांचे प्रेम पाहून मी भारावून गेलो, कित्येक हत्तींचे बळ या प्रेमामुळे मला मिळाले असून, यापुढे देखील अधिक जोमाने काम करु, असे आश्वासन मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी स्वागतासाठी उपस्थित असलेल्या नागरिकांसमोर दिले़ वर्षभरात पाणीप्रश्न मिटेल, असेही ते म्हणाले़
आयुक्त गुडेवार यांनी गुरुवारी पदभार घेतला़ हारतुरे, सत्कारसोहळे पार पडल्यानंतर त्यांनी इंद्रभुवनाबाहेर बँजो गाडीत उभे राहून उपस्थित जनसमुदायासमोर आपल्या भावना व्यक्त केल्या़ शहराचे नावलौकिक होईल अशा पध्दतीने काम करु़ माझ्या ४९ वर्षांच्या आयुष्यातील आनंदाचा हा परमोच्च क्षण आहे़ मी आयुष्यभर हे विसरु शकणार नाही़ खूप कमी अधिकार्यांना असे क्षण लाभतात़ मिळालेली ऊर्जा आयुष्यभर पुरेल़ अधिक जोमाने शहराचे काम करु, असेही गुडेवार म्हणाले़ यावेळी नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनीही भाषण करुन गुडेवारांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे सांगितले़ गुडेवारांच्या कामात अडथळा निर्माण केला तर याद राखा, असा इशारा कामगार नेते अशोक जानराव यांनी दिला़ सुमारे एक तास सत्कार सोहळा सुरू होता़ हारतुर्यांचे ढीग इंद्रभुवनात साचले होते़
-----------------------------------------------
स्वप्न साकार करु़़़
दोन दिवसांपूर्वी मी पदभार सोडायला नको होता, मात्र त्याशिवाय तुमचे प्रेमही कळाले नसते (हशा़़़), अशा भावना आयुक्त गुडेवार यांनी व्यक्त केल्या़ शहराचे नावलौकिक होईल असे काम करुन दाखवू ़ शहराचे स्वप्न साकार करू, तुमचे प्रेम असेच राहू द्या, असे ते म्हणाले़
------------------------------------------------------------------
वर्षभरात पाणीप्रश्न मिटेल़ पाण्याचे जे जे विषय मनपा सभागृहापुढे निर्णयासाठी आहेत त्याबाबत मी महापौरांशी बोलणार आहे़ लवकरच या विषयांना मंजुरी देण्यात येईल़
चंद्रकांत गुडेवार
मनपा आयुक्त