घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न; मुलीची बॅग परत न दिल्याप्रकरणी आई, वडील व भावावर गुन्हा
By रूपेश हेळवे | Published: April 8, 2023 03:29 PM2023-04-08T15:29:11+5:302023-04-08T15:29:32+5:30
मुलीच्या सासरच्या घरी येऊन तिच्याकडून लॅपटॉप व कंपनीचे कागदपत्रे असलेली बॅग आई, वडील व भावाने नेले.
सोलापूर : मुलीने घरच्यांच्या विरोधात जाऊन आत्याच्या मुलाबरोबर लग्न केले. यामुळे मुलीच्या सासरच्या घरी येऊन तिच्याकडून लॅपटॉप व कंपनीचे कागदपत्रे असलेली बॅग आई, वडील व भावाने नेले. पण ती बॅग परत न दिल्याप्रकरणी मुलीच्या फिर्यादीवरून तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी अनुशा राजामौली वेल्दी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी अनुशा यांनी आत्याच्या मुलाबरोबर मागील महिन्यात लग्न केले हाेते. ते लग्न फिर्यादी यांच्या आई-वडिलांना मान्य नव्हता. त्यांनी फिर्यादीच्या सासरच्या घरी येऊन फिर्यादींचा विश्वास संपादन करून फिर्यादीला कंपनीचे काम करण्यासाठी दिलेला लॅपटॉप, डिवाइस, मोबाईल, बँकेचे एटीएम कार्ड, पासबुक, शैक्षणिक कागदपत्रे, आधार कार्ड, पॅन कार्ड असलेली बॅग घेऊन गेले. ती बॅग परत न दिल्याने फिर्यादींनी याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली आहे.
त्यांच्या फिर्यादीवरून वडील राजमौली वेल्दी, आई सुजाता वेल्दी, भाऊ अजयकुमार वेल्दी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक कांबळे करीत आहेत.