Good Breaking; सोलापुरला एक्सपोर्ट सेंटर म्हणून केंद्राची मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 07:19 AM2020-06-11T07:19:02+5:302020-06-11T07:39:25+5:30

आता चादर, टॉवेलची आखाती देशात होणार निर्यात; सोलापूरकरांसाठी दिलासा देणारा निर्णय

Good Breaking; Recognition of Solapur as an export center | Good Breaking; सोलापुरला एक्सपोर्ट सेंटर म्हणून केंद्राची मान्यता

Good Breaking; सोलापुरला एक्सपोर्ट सेंटर म्हणून केंद्राची मान्यता

googlenewsNext
ठळक मुद्देआता सोलापुरातील चादर आणि टॉवेल पोहोचणार विदेशातनिर्यात करणाऱ्या उद्योजकांना दिलासा देणारी बातमी

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यास देशातील एक्सपोर्ट सेंटर म्हणून मान्यता आले आहे. याबाबतचे पत्र नवी दिल्ली येथील परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाचे प्रमुख अधिकारी रणजित कुमार रॉय यांनी प्रसिद्धीस दिले.

केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी राष्ट्रीय महामार्ग, फलोत्पादन यामुळे सोलापूर जिल्हा पोषक असल्याने सोलापूर ला एक्सपोर्ट सेंटर म्हणून मान्यता देण्याची विनंती केली होती. त्या विनंतीचा विचार करून विदेशी मंत्रालयाने महाराष्ट्रातील सोलापूरला एक्सपोर्ट सेंटर म्हणून मान्यता दिली आहे.

सोलापूरच्या टेक्सटाइल उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात याचा फायदा होणार असून सोलापुरातील वस्त्रोद्योग उद्योजकांना व कामगारांना याचा फायदा होणार आहे.

परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने (डीजीएफटी) “निर्यात हब माहिती देणारे जिल्हे” सादर केले. या संदर्भात जिल्ह्यांची निर्यात हब म्हणून देशातील भुवनेश्वर (ओडिशा), इम्फाल (मणिपूर), जम्मू (जम्मू व जम्मू-काश्मीर), रामनगर (कर्नाटक) आणि सोलापूर (महाराष्ट्र) ला मान्यता दिली आहे. 

सोलापुरात चादर, टॉवेलची निर्मिती होते.  सोलापुरातील सर्व निर्यातदार आणि निर्यातीत प्रवेश करणार्‍यांसाठी हे एक्स्पोर्ट सेंटर दिलासादायक ठरणार आहे. टेरी कापड उत्पादनांची निर्यात करण्यासाठी सोलापूर हा नेहमीच एक महत्त्वाचा समूह राहिला आहे. सोलापुरी चादर आणि टॉवेल्ससाठी जगप्रसिद्ध आहे. टेरी टॉवेल्समधील हे सर्वात मोठे क्लस्टर आहे. युरोप, आखाती देश दक्षिण आफ्रिका, श्रीलंका इ. मध्ये निर्यात करण्यासाठी आता सोलापुरातील उद्योजकांना संधी मिळणार आहे. सोलापूरला एक्सपोर्ट सेंटर बनवा या मागणीसाठी चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी राज्यासह केंद्राकडे मागणी लावून धरली होती. 

Web Title: Good Breaking; Recognition of Solapur as an export center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.