भल्या पहाटे धाड टाकून ४० लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:42 AM2020-12-05T04:42:54+5:302020-12-05T04:42:54+5:30

सरकोली येथील भीमा नदीच्या काठावरून वाळू भरून दोन वाहने पुळूज येथील बंधारा ओलांडून जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यामुळे ...

Good morning raid and confiscation of Rs 40 lakh | भल्या पहाटे धाड टाकून ४० लाखांचा मुद्देमाल जप्त

भल्या पहाटे धाड टाकून ४० लाखांचा मुद्देमाल जप्त

Next

सरकोली येथील भीमा नदीच्या काठावरून वाळू भरून दोन वाहने पुळूज येथील बंधारा ओलांडून जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यामुळे त्या ठिकाणी जाऊन पहाटे ४.४५ वाजता छापा टाकला.

त्या ठिकाणी पोलिसांकडून २३ लाख रुपये किमतीचा जेसीबी (एमएच ११ बीए ५३४६), १५ लाख २० हजार रुपये किमतीचा टिपर (एमएच १० एडब्ल्यू ७८४१) व त्यात २० हजार रुपये किमतीची ४ ब्रास वाळू, २ लाख ५ हजार रुपये किमतीचे बिगर नंबरचे वाहन व त्यात ५ हजार रुपये किमतीची वाळू असा एकूण ४० लाख २५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी सुधीर ऊर्फ छोटू सागर माने, जीवन दत्तात्रय भोसले, नवनाथ सुरेश भोसले, नितीन धोंडिराम भोसले, सचिन तुकाराम भोई, कल्याण भोसले, सोमनाथ विठ्ठल भालके (सर्व रा. सरकोली) व सूरज अर्जुन म्हमाणे (वय २७, रा. शंकरगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

ही कारवाई पोलीस निरीक्षक किरण अवचर, सहा. पोलीस निरीक्षक आदिनाथ खरात, हवालदार विनायक नलवडे, सुधीर शिंदे व पोलीस कॉन्स्टेबल देवेंद्र सूर्यवंशी यांनी केली.

Web Title: Good morning raid and confiscation of Rs 40 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.