Good News; जलसंपदा विभागात आउटसोर्सिंगद्वारे १४ हजार पदांची भरती करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2022 02:45 PM2022-02-22T14:45:56+5:302022-02-22T14:46:02+5:30

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली सोलापुरात माहिती

Good News; 14,000 posts will be recruited in the water resources department through outsourcing | Good News; जलसंपदा विभागात आउटसोर्सिंगद्वारे १४ हजार पदांची भरती करणार

Good News; जलसंपदा विभागात आउटसोर्सिंगद्वारे १४ हजार पदांची भरती करणार

googlenewsNext

सोलापूर :- जिल्ह्यातील सर्व नद्यांवर मोठ्या क्षमतेचे बॅरेजेस बांधण्याचे नियोजित असून पहिल्या टप्प्यात भीमा नदीवर प्रत्येकी बारा टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेले 9 बॅरेजेस निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली.

 नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित सोलापूर जिल्हा जलसंपदा आढावा बैठकीत जलसंपदामंत्री पाटील बोलत होते. यावेळी आमदार समाधान अवताडे, सचिन  कल्याणशेट्टी, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, दीपक साळुंखे, जलसंपदा सचिव श्री. राजपूत, जलसंपदा चे मुख्य अभियंता धुमाळ, अधीक्षक अभियंता भीमा कालवे मंडळ डी. ए. बागडे, अधीक्षक अभियंता साळे यांच्यासह जलसंपदा विभागाचे सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी जलसंपदा विभागाकडे असलेला अपुरा कर्मचारी वर्ग तसेच धरणाच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केला असता त्यावर बोलताना जलसंपदामंत्री पाटील म्हणाले की, जलसंपदा विभागामार्फत आउटसोर्सिंग द्वारे पुढील एक -दोन महिन्यात चौदा हजार अधिकारी कर्मचाऱ्यांची पदे भरली जाणार आहेत, त्यामुळे राज्यात सर्वत्र जलसंपदा विभागाला पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

सिंचन प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या घेण्यात आलेल्या जमिनीचा त्यांना योग्य मोबदला वेळेत मिळावा यासाठी जलसंपदा विभाग व महसूल विभागाच्या भूसंपादन शाखेनी एकत्रित येऊन शिबिराचे आयोजन करावे व संबंधित शेतकऱ्यांच्या तक्रारींचा निपटारा करून त्यांना तात्काळ मोबदला देण्याबाबतची कार्यवाही करावी, असे निर्देशही यावेळी पाटील यांनी दिले. तसेच असे शिबिर लवकर आयोजन करण्याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क ही साधला.

  

Web Title: Good News; 14,000 posts will be recruited in the water resources department through outsourcing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.